उदगीरात रेमडेशिवर चा काळाबाजार जोरात,रुग्णांचे हाल :- आरोग्य विभागाची व औषधी विभागाची अर्थपूर्ण सहमती ? उदगीर:- उदगीर व परिसरात मागील काही दिवसा पासून कोरोना रुग्ण वाढत असल्याने रेमडेशिवर इंजेक्शनचा अनेक औषधी दुकानातुन काळाबाजार जोरात चालू असून किम्मत ऐकूनच रुग्णांच्या नातेवाईकांना भोवळ येत आहे शासनाने एकीकडे रेमडेशिवर इंजेक्शन चा दर हा हजारा खाली जाहीर केला असताना येथील अनेक औषधी दुकानदारा कडून हे इंजेक्शन 3800 ते 4500 रुपया पर्यंत तेही रुग्णांच्या नातेवाईकांना ताटकळत ठेऊन देत असून ही येथील आरोग्य विभाग व औषधी विभाग मूग गिळून रुग्णांची लूट पाहत असल्याने त्यांचे काही या औषधी दुकानदारा सोबत अर्थपूर्ण सहमती तर नाही ना हा प्रश्न रुग्णांचे नातेवाईक बोलून दाखवत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी