बिघाड सोलापूरात, बी एस एन एल ग्राहक उदगीरात परेशान उदगीर:- उदगीर मधील बी एस एन एल ग्राहक मागील काही दिवसांपासून एवढे परेशान आहेत ना फोन लागतो,लागला तर दुसरीकडे जातो,नेट नावालाच 4 जी पण स्पीड 2 जी ही नाही,अधिकारी म्हणतात बिघाड सोलापुरात पण ग्राहक येथे परेशान आहेत बी एस एन एल ची म्हण आहे कनेकटिंग इंडिया पण उदगिरतील ग्राहकांना इंडिया सोडा बाजूच्या ग्राहकास बोलणे अवघड झाले आहे,कॉल एकास लावले की अन्य व्यक्ती बोलतो,फोन बाजूस बसून लावले तर अनेकवेळा कॉल करून ही सदरील व्यक्ती कवरेज क्षेत्राच्या बाहेर सांगते ,नावालाच 4 जी स्पीड 2 जी ही नाही,या मुळे अनेक ग्राहक वैतागुन गेले असून ना विलाजाने एक वर्ष्याचे रिचार्ज मारल्याने दुसरीकडे जाता ही येत नाही आणि हे चालत ही नाही म्हणण्याची वेळ बी एस एन एल ग्राहकांवर अली असून या बाबत चौकशी केले असता अधिकारी म्हणतात की बिघाड सोलापुरात आहे ,बिघाड सोलापुरात आणि ग्राहक परेशान उदगीरात असे असून या कडे वरिष्ट विभागाने त्वरित लक्ष देण्याची वेळ आली असल्याचे अनेक जण उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
