**उदगीर येथे कोव्हिड ट्रामा केअर 10 दिवसांत कार्यान्वीत करावे* - *राज्यमंत्री संजय बनसोडे* *उदगीर येथील बैठकीत राज्यमंत्र्यांचे निर्देश. *कोरोनावर मात करण्यासाठी जनतेने शासकीय नियमावलीचे पालन करावे.* उदगीर:-जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यात यावे.तसेच शहरी भागातील कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करुन, व्यापारी व फेरीवाल्यांच्याही कोव्हिड चाचण्या करण्या बाबतचे निर्देश राज्याचे पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज उदगीर येथील सभागृहात दिले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव,जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे आदिसह मान्यवर उपस्थित होते. राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, उदगीर येथे कोव्हिडसाठी नियोजित असलेले ट्रामा केअर पूर्णत्वास आला असून येत्या 10 दिवसांत कार्यान्वीत करण्यात यावे तसेच वैद्यकीय सेवेसाठी अवश्यक असलेले रिक्त पदे भरण्यात यावे. लोकांच्या मनामधील कोरोनाची भिती लक्षात घेता कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने निर्बंध लावलेल्या नियमावलीचे कडक पध्दतीने अंमलबजावणी होणे अवश्यक आहे.ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव फार मोठया प्रमाणात वाढत असून त्यासाठी कोरोना फोर्स सक्रीय करुन गावामधील लोकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर, भौतिक अंतर पाळणे या बाबत ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गांर्भीयाने काम करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील लोकांना मास्क लावण्यासाठी बंधनकारक करुन दंडात्मक कार्यवाही करण्या बाबत सूचित केले. कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाने जे निर्बंध लावले आहेत त्याचे सर्वानी काटेकोरपणे पालन केले तर कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी यश मिळेल असे ही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. सध्या चालू असलेली लसीकरण मोहिमेमध्ये 45 वर्षावरील नागरीकांना लस देण्यासाठी जनजागृती करुन नागरीकांनी लस घेण्याबाबत सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे व मोठया प्रमाणावर लसीकरणही होणे गरजेचे आहे असे त्यांनी सूचित केले. कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांचे ट्रेसिंग व टेस्टींग करुन मोठया प्रमाणात चाचण्या करुण रुग्णांना 15 दिवस कमीत कमी आयसोलेशन केंद्राच्या बाहेर कोणत्याही कोरोना बाधित रुग्णांना बाहेर न जाऊ देण्या बाबत त्यांनी आढावा बैठकीत सूचित केले. कोविड सेंटरमध्ये व कोव्हिड रुग्णालयांमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण अत्यंत दर्जेदार / चवीष्ट देण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. रेमडिसीवीर या इंजेक्शनचा जिल्हयात होणारा काळा बाजार रोखण्यासाठी सदरील इंजेक्शन मूळ रकमेलाच रुग्णाला प्राप्त झाले पाहीजेत याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी. जिल्हयातील सर्व नगर पालिका/ नगर पंचायत,आरोग्य विभाग, महसूल यंत्रणा आणि पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी दररोज कोव्हीड बाबत आढावा बैठक घ्याव्या व एकमेकांशी समन्वय ठेवावा असे यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी उदगीर तालुक्यात नवीन कोरोना टेस्टींग लॅब उभारण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रस्ताव पाठवावे असे सूचित केले.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image