विनामास्क प्रसाद कलेक्शन वर कारवाई 2 हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल उदगीर:- उदगीर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग असतानाही दुकानात विना मास्क ग्राहक घेऊन व्यापार करणाऱ्या प्रसाद कलेक्शन वर कार्यवाही करून 26 व्यक्ती कडून 2600 रुपये दंड वसूल करण्यात आला उदगीर शहरात कोरोना चा वाढता प्रभाव असून ही काही दुकानात विनामास्क व्यापार करत असल्याने उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख विश्वनाथ दिवे यांनी हेड कॉन्स्टेबल मोतीपवळे यांचे पथक नेमले होते या पथकास शिवाजी चौक ते मोंढा रोडवरील प्रसाद कलेक्शन या नामांकित दुकानात मास्क न लावता कपडे खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार 3 एप्रिल रोजी दुपारी 12 वजनाच्या सुमारास त्या दुकानात अचानक छापा टाकला असता दुकानात लोकांची गर्दी आढळून आली त्यात 26 व्यक्ती विनामास्क आढळून आले त्या 26 व्यक्तीचे प्रत्येकी 100 रुपया प्रमाणे दोन हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला याकामी पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश फुलारी पोलीस कॉन्स्टेबल तानाजी विभूते पाटील, एस एम मंगणाळे जी जी आचमारे, बी एस होमगोर्ड डी एस मसुरे, यु पी रणदिवे यांच्या पथकाने कारवाई केली
• श्रीनिवास मदनलाल सोनी