उदगीरात आता रेमडीशिवर पाठोपाठ ऑक्सिजन चा तुटवडा :- कोरोना रुग्णाचे बेहाल, डॉक्टरच परेशान उदगीर:- उदगीर शहरात दिवसेंदिवस कोरोना ने एकीकडे कहर माजविला असताना मागील काही दिवसांपासून रेमडीशिवर इंजेक्शन मिळत नसताना आज ऑक्सिजन चा तुटवडा झाल्याने डॉक्टर परेशान आहेत उदगीर शहरात दररोज अंदाजे ऑक्सिजन चे 200 च्या वर सिलेंडर लागतात पण वरून पुरवठा नसल्याने आज शहरात फक्त 60 सिलेंडरच आल्याने ऑक्सिजन चे गणित बिघडले असून जे रुग्ण व्हेंटि व ऑक्सिजन वर आहेत त्यांना कसे वाचवायचे हा प्रश्न पडला असल्याचे डॉ अनुप चिकमुर्गे यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना ही चिंता व्यक्त केली आहे, ऑक्सिजन चा पुरवठा त्वरित वेवस्थित करावा अशी मागणी डॉक्टर व रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
