जिल्हा प्रशासनाकडून उदगीरला 60 रेमडिसीवीर तर लातूर ला 309 वाईल्सचे वितरण उदगीर:- आज लातूर जिल्हयात लातूरसाठी 309 आणि उदगीरसाठी 60 रेमडिसीवीर वाईल्स उपलब्ध् झाल्या. लातूरसाठी प्राप्त 309 रेमडिसीवीर वाईल्स पैकी 228 मान्यताप्राप्त खाजगी कोव्हिड रुग्णालयांना वितरीत करण्यात आले असून उर्वरित 81 रेमडिसीवीर खुल्या पध्दतीने वाटप करण्यासाठी शहरातील प्रकाश मेडीकल स्टोअर्स, मातोश्री मेडीकल स्टोअर्स आणि वारद मेडीकल स्टोअर्स या तीन औषधी दुकानदारांना जिल्हा प्रशासनाकडून वितरीत करण्यात आले आहेत. तसेच उदगीर येथील 6 रुग्णालयांना 60 रेमडिसिवीर वितरीत करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन तथा नोडल अधिकारी रेमडिसीवीर वितरण, लातूर गणेश महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी