डोळे ही सजीवांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. डाॅ.रामप्रसाद लखोटीया उदगीर :- जन्मजात आंधळे असणे किंवा अपघाताने अंधत्व येणे यामुळे अशा व्यक्ती सृष्टीच्या सौंदर्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.मात्र आज विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या आधारे आपण एका व्यक्तीची दृष्टी दुसर्या एका अंध व्यक्तीला देऊन त्याचे जीवन प्रकाशित करू शकतो. नेत्रदानासाठी जगभरातील विविध सामाजिक, रुग्णालयीन संस्था पुढे येत आहेत. लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच नेत्रदानाबद्दल माहिती देण्यासाठी या संस्थांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.असे ते 10 जुन जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात डाॅ.रामप्रसाद लखोटीया बोलत होते. या कार्यक्रमाला उदगीर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ मोतीपवळे हे अध्यक्ष लाभले होते.तर मंचावर उपस्थित उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्णालय चे अध्यक्ष डाॅ.रामप्रसाद लखोटीया,जेष्ठ पत्रकार व्ही.एस.कुलकर्णी,धनंजय गुडसुरकर,दिपक बलसुलकर ग्रंथ मित्र रिंकू पाटील मॅडम औठे मॅडम,एस एस पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना १० जून रोजी ‘जागतिक नेत्रदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्रविशारद डॉ.आर.ए.भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिनाचे आयोजन करण्यात येते.या निमित्ताने नेत्रदानासाठी इच्छुक सर्वांनी जवळील एका नेत्रपेढीत जाऊन नावाची नोंदणी करावी. मृत्यूनंतर नेत्रदान होत असल्याने,आपल्या मृत्यूनंतर अंधाला नेत्रदान करून आपण त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणू शकतो असे त्यांनी बोलताना उपस्थित माण्यवर व अंधमुलांना केले. यावैळी गणेश मुंडे,सुरेश तिवारी,तानाजी हजारे,विष्णू पवार,संजय पाटील,चव्हाण सर तथा अंध मुल सामाजिक अंतर राखुन उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गायकवाड यांनी केले तर आभार रेखा माने यांनी मानले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
