लग्न करणाऱ्यांना आता 'नो टेन्शन', राज्य सरकारकडून नियमात बदल :- येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. लग्न (wedding ceremony) करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. उदगीर: येत्या सोमवारपासून म्हणजेच 7 जूनपासून महाराष्ट्र पाच स्तरांमध्ये अनलॉक होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील अनलॉकबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठवड्यात होणार आहे. म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होईल, असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी लग्न करणाऱ्यांसह हॉल चालकांना राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. लग्न सोहळ्यासाठीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. लग्न सोहळ्यासाठी अशी असेल परवानगी राज्य सरकारनं केलेल्या वर्गीकरणानुसार पहिल्या स्तरात लग्न सोहळ्यास कोणतेही बंधनं नसणार आहेत. दुसऱ्या स्तरात लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. तिसऱ्या स्तरात लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती बंधनकारक असेल. तर चौथ्यामध्ये लग्न सोहळ्यास केवळ 25 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी