आर टी ओ आणि महसूल च्या कृपेने वाळू माफिया सुसाट :- उदगीर परिसरात वाळू स्टॉकिस्ट चा धंदा जोरात :- ओवर लोड टिप्पर ला परिवहन अधिकारयाचे अभय तर महसूल मधील वाझे चा पाठिम्बा ? उदगीर:- उदगीर व परिसरातील रहिवाश्याना स्वपनातील घर बाँधन्याचे स्वप्न आर टी ओ आणि महसूल च्या कृपेने स्वप्नच राहणार असे दिसत आहे उदगीर परिसरात सद्या जिकडे पहावे तिकडे वाळू माफिया ची चलती दिसत आहे,ज्याचे बांधकाम नाही अश्यानी अनेक ठिकाणी अवैध वाळूचा स्टॉक करुण ठेवला असून याना महसूल विभागाचा आणि परिवहन विभागाचे अर्थपूर्ण पाठिम्बा असल्याचे अनेक जन बोलत आहेत,कारण की प्रत्येक टिप्पर हे अनलोड भरून येत असून है परिवहन अधिकारी याना दिसत नसेल का किंवा सामान्य जनतेस वाळू साठी वन वन भटकुन अवा च्या सवा भाव देऊन ही वाळू मिळत नसताना स्टॉक करणाऱ्यानी कोणाच्या जीवावर आणि महसूल विभागातील वाझे च्या कृपे शिवाय शक्यच नाही असे लोक बोलत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी