निड़ेबन ग्रामपंचायत मधे मोठा भ्रष्टाचार:-रणजीत पाटील :- 11 लाखाचे बल्ब गायब,रस्ते गायब,गावत स्वछतेचा बोजवारा, करोडो ची घर पट्टी वसूली ,नामान्तर वसूली ना किर्द न हिशोब जो तो आपले घर भरण्यात व्यस्त असल्याचे ही त्यांचे म्हणणे उदगीर:- उदगीर चे उपनगर निड़ेबन ग्रामपंचायत मधे करोड़ो चा भ्रष्टाचार होऊन ही अनेक तक्रारी देऊन काहीच होत नसल्याने आता हलगी आंदोलन करणार असल्याचे येथील ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटील यानी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा व्यक्त केली आहे निड़ेबन ग्रामपंचायत ही उदगीर ची एक बाजू असून या ग्रामपंचायत ला करोडो चे उत्पन्न असून या ग्रामपंचायत ला विद्दुत बल्ब साठी 11 लक्ष रूपयाचा निधि मिळाला पन गावत एक ही बल्ब बसवन्यात आले नाही,15 व्या वित्त अयोगातून दलित वस्ति रस्ते साठी निधि आला तो रस्ता अन्य ठिकाणी करण्यात आला, गावातील आंगनवाडी चिखलाने भरून आहे मुलाना तेथे जाता येत नाही, जिल्हा परिषद भाजपा सदस्यानी करोडो चा निधि दिला त्याचा कुठालच हिशोब मागितला तर ग्रामसेवक देत नाही याच्या अनेक तक्रार उदगीर च्या गटविकास अधिकारया कड़े केले पन त्याना पाकिट मिळत असल्याने तेहि मुग गिळून गप्प असून तेहि मी ग्रामपंचायत सदस्य असूनही देत नाहीत या ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराने कळस गाठला असून आता आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे येथील ग्रामपंचायत सदस्य रणजीत पाटिल यानी पत्रकार परिषद घेऊन सांगितले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
