ऑटोचालकाची ईमानदारी,मजूराचे ऑटो मधे विसरलेले 47500 रु केले परत :- पत्रकार व पोलीस विभागातर्फे त्याचा गौरव उदगीर:- सोमनाथपुर येथील विट भट्टी वर मजूरी करणारे प्रेमदास सोनकांबळे हे ऑटो MH24 E 3538 ने आपल्या मुलीच्या 7 महिन्याच्या बाळास वायगावकर हॉस्पीटल मधे बिल अदा करण्यास जात असताना त्याची 47520 रूपयाची थैली ऑटो मधे राहिली असता ऑटोचालक रवि साताळे है दूसरे भाड़े घेऊन कमालनगर येथे गेले असता त्याना बैग ऑटोमधे मागे ठेवलेली दिसलीअसता त्यानी परत वायगावकर हॉस्पिटल येथे गेले पन तेथे प्रेमदास न सापडल्याने त्यानी सदरिल रकमेची थैली शहर पोलीस स्टेशन येथे घेऊन आले असता तेथे प्रेमदास थैली गेली म्हणून आले असता प्रेमदास च्या पैशाची थैली पोलीस अधिकारी यांच्या समक्ष त्याना दिली ,रवि सताळे यांच्या ईमानदारी बद्दल उपस्थित पत्रकार श्रीनिवास सोनी,सुनील हवा,बिबिशन मद्देवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, बसवेश्वर डावले व पोलीस निरीक्षक गोरख दिवे,सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड़ यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला,प्रेमदास यानी ही रक्कम विट भट्टी वर मजूरी करुण आणली होती
• श्रीनिवास मदनलाल सोनी

