SBI बँकेच्या मॅनेजर ची गाढवावरून धिंड काढणार. प्रदीप पाटील खंडापुरकर उदगीर:- *रुबीना बदबदे या दिव्यांग महीलेची चप्पल बुट बांगडी व्यवसायाची कर्ज प्रकरणाची फाईल नाकारणार्या SBI बँक शाखा डाळींब च्या बँकेवर 23 जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आसुन संबंधित बँक मॅनेजर ची गाढवावरून बसवुन धिंड काढण्यात येणार आसल्याचे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांनी डाळींब येथे झालेल्या दिव्यांगांच्या मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात जाहीर केले* *खंडापुरकर बाबा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, दिव्यांगाचे दु:ख खुप मोठे आसते,डाळींब ता. उमरगा जि.उस्मानाबाद येथील रुबीना रसुल बदबदे ही महीला जन्माताच अंपंग आहेत,त्यांना चालता येत नाही,अपंगत्वा मुळे त्यांचा विवाह झाला नाही.त्या आपल्या व्रुध माता पित्यांना छोटेश्या चप्पल बुटाच्या दुकानातुन मिळणार्या उत्पन्ना वर जगवतात* *रुबीना ने दीड वर्षा पुर्वी समाज कल्याण विभाग उस्मानाबाद मार्फत SBI शाखा डाळींब कडे चप्पल,बूट आणी बांगड्यांच्या व्यवसाया साठी कर्जाची मागणी केली होती.रुबीना ने दीड वर्ष बँके कडे चक्करा मारल्या पण त्यांची कर्ज प्रकरणाची फाईल बँकेनी मंजुर केली नाही.उलट बँक मॅनेजर म्हणतात की आमची बँक दिव्यांगा साठी कर्ज देत नाही. या बँक मॅनेजर च्या ताठर भुमीकेच्या निषेधार्थ दिनांक 23 जुलै रोजी SBI बँक शाखा डाळींब वर मोर्चा काढुन बँक मॅनेजर ची गाढवावरून बसवून धिंड काढण्यात येणार आसल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबानी जाहीर केले, आणी बँक मॅनेजर शिवराज घाटगे यांना निवेदन दिले*
• श्रीनिवास मदनलाल सोनी
