१८ आणि १९ डिसेंबर रोजी उरळी कांचन येथे मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन :एस.एम.देशमुख :- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्हयातील उरुळी कांचन येथे होत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी काल उरुळी कांचन येथे झालेल्या एका बैठकीत केली.दर दोन वर्षांनी होणारे पत्रकारांचे हे अधिवेशन ऑगस्टमध्येच होणं अपेक्षित होतं मात्र कोरोनामुळं अधिवेशन लांबणीवर टाकावे लागले होते..देशभरातुन दोन हजार प्रतिनिधी अधिवेशनास उपस्थित राहतील असा अंदाज देशमुख यांनी व्यक्त केला त्यादृष्टीने तयारी केली जात आहे . अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही देशातील मराठी पत्रकारांची सर्वात जुनी आणि एकमेव संघटना आहे..दिल्ली, गोवा,बेळगाव सह राज्यातील ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेचा शाखा विस्तार झालेला असून जवळपास नऊ हजार पत्रकार परिषदेशी जोडलेले आहेत.दर दोन वर्षांनी होणारे हे अधिवेशन यापुर्वी रोहा, औरंगाबाद, शेगाव, पिंपरी-चिंचवड, नांदेड आदि ठिकाणी संपन्न झाले होते.उरुळी कांचन सारख्या ग्रामपंचायत क्षेत्रात प्रथमच हे अधिवेशन होत आहे.काल एस.एम.देशमुख, परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांनी नियोजित अधिवेशनाच्या जागेची पाहणी केली. दोन वर्षांपुर्वी नांदेड येथे झालेल्या पत्रकारांच्या अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकाराच्या हस्तेच व्हावे अशी भूमिका परिषदेने घेतली.. त्यानुसार नांदेड अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांच्या हस्ते करण्यात आले होतेे.यावर्षी देखील एका ज्येष्ठ आणि मान्यवर पत्रकाराच्या हस्ते अधिवेशऩाचे उद्धघाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून राज्यातील मान्यवर नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. अधिवेशनात दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. चर्चासत्र, परिसंवाद, आदि कार्यक्रमाबरोबरच आप की आदालत पध्दतीवर आधारित एका वरिष्ठ पत्रकाराच्या मुलाखतीचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे.डिजिटल माध्यमांचा प्रभाव बघता प्रिन्ट मिडियाला काही भवितव्य उरले आहे काय? या महत्वाच्या सर्व पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर देखील अधिवेशनात विचारमंथन होईल. पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि हवेली तालुका मराठी पत्रकार संघ हे या अधिवेशनाचे आयोजक आहेत.अधिवेशनास येणाऱ्या पत्रकारांची संख्या लक्षात घेऊन आरोग्य विषयक सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. दोन कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेल्या पत्रकारांनाच अधिवेशनात प्रवेश दिला जाईल, तसेच अधिवेशनात सोशल डिस्टंन्सिन, सॅनिटाईझर वापर, शारीरिक तापमान तपासणी बरोबरच आरोग्य पथक देखील तैनात करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीस स्थानिक संयोजन समितीचे पदाधिकारी सुनील जगताप, जनार्दन दांडगे, एम.जी.शेलार. बापुसाहेब काळभोर, गणेश सातव, तुळशीराम घुसाळकर, शहाजी नगरे, जयदिप जाधव, सुखदेव भोरडे, जितेंद्र आव्हाळे, विजय काळभोर, अमोल भोसले, सचिन माथेफोड, प्राचार्य बी.के. दिवेकर, उपप्रमुख बी.आर. भोसले आदि उपस्थित होते. राज्यातील पत्रकारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अधिवेशनास पत्रकारांनी सर्व नियमांचे पालन करित मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव बापुसाहेब गोरे, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, महिला संघटक जान्हवी पाटील, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, संयोजन समितीचे सुनील जगताप, जनार्दन दांडगे, बापुसाहेब काळभोर, गणेश सातव, तुळशिराम घुसाळकर, शहाजी नगरे, जयदिप जाधव, सुखदेव भोरडे, जितेंद्र आव्हाळे, अमोल भोसले, विजय काळभोर, आदिंनी केले आहे.
Popular posts
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेवर युतिचा झेंडा फडकेल = बस्वराज पाटील मुरूमकर 👉 आत्ताच विरोधकांची झोप उडाली उदगीर= उदगीर नगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याने विरोधकांची झोप उडाली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे उदगीर येथे युतीच्या उमेदवारा ची माहिती देण्यास बोलावलेल्या पत्रकार परिषदे नंतर उदगीर समाचार सोबत बोलताना पाटील म्हणाले की उदगीर नगर पालिके वर युती चा झेंडा फडकणार असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,आज विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, देशात भाजप्,राज्यात युती चे सरकार असून आम्ही जो विकास केला आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा वर स्वाती सचिन हुडे व आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या न भूतो न भविष्ती अशा मतांनी विजयी होतील यात आम्हाला शंका नाही असेही ते म्हणाले या वेळेस आ संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, मा. आ.गोविंद केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
Image
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल