उदगीर ची प्रियदर्शिनी सोमय्याच्या रडार वर? :- किरीट सोमय्या ना भेटून आपली व्यथा मांडनार प्रियदर्शिनी चे सभासद उदगीर:- उदगीर च्या नावलौकिकात असलेला प्रियदर्शिनी साखर कारखाना साखर सम्राटानी सभासद शेतकऱ्यांना देशोधड़ीला लाऊन गिलंकृत केला त्याची कैफियत सभासद शेतकरी लातुर दौऱ्यावर येत असलेले किरीट सोमया यांच्या कड़े मांडनार असल्याने सोमय्या प्रियदर्शिनी बद्दल काय भूमिका घेतात हे पहावे लागेल मराठवाड्यात भव्य व दिव्य अस्या प्रियदर्शिनी साखर कारखाण्याची निर्मिति स्व.माजी खासदार अरविंद कांबळे यानी तोंडार पाटी येथे केली आणि त्यास आपले दैवत म्हणून प्रियदर्शिनी नाव दिले,कारखाना वेवस्थित चालत असताना काहीना अरविंद कांबळे चे प्रियदर्शिनी रुपात वाढत असलेले विकास पहावले गेले नाही,अरविंद कांबळे यानी 16000 च्या वर या कारखान्याचे पांच तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांना सभासद केले ,त्यानी हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवत असल्याचे न देखउन हा कारखाना अवसानयात काढून व या कारखाण्याची मालमत्ता डोळ्यासमोर ठेऊन तो आपल्या त्याब्यात कसा येईल हे पाहुन अरविंद कांबळे यांचे खच्चीकरण करुण व 16 हजार पेक्ष्या जात सभासद शेतकऱ्यांना देशोधड़ीला लाऊन ,प्रियदर्शिनी नावास मुठमाती देऊन हा कारखाना गिलंकृत केला, अस्या अनेक कारखाण्याची यादि घेऊन भाजपा चे किरीट सोमय्या है सम्पूर्ण महाराष्ट्र भर रान उठवत असल्याने सगळ्या साखर सम्राटाची झोप उडाली असून ,सोमय्या है 27 ऑक्टोबर रोजी लातुर दौऱ्यावर येत असून प्रियदर्शिनी चे शेतकरी सभासद त्याना भेटून साखर सम्राट यानी शेतकऱ्यांना देशोधड़ीला लाउन हा कारखाना कसा गिलंकृत केला हे सांगणार असल्याने ,सोमय्याच्या रडार वर आता उदगीर चा प्रियदर्शिनीअसणार असे लोक चर्च्या करताना दिसत असून ,प्रियदर्शिनी च्या शेतकरी सभासदाना सोमय्या काय आश्वासन देतील हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी