दसरया निमित्त होणारा रावण दहन कार्यक्रम रद्द उदगीर:- दसरया निमित्त जिल्हा परिषद मैदान येथे होणारा रावण दहनाचा कार्यक्रम कोरोना च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचे सार्वजनिक दसरा महोत्सवाचे प्रमुख ऍड गुलाब पटवारी यानी सांगितले आहे येथील जिल्हा परिषद मैदानावर दसरा निमित्त शहरातील विविध पालख्याचे आगमन व रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सम्पन्न होते हा सोहळा पाहण्यासाठी शहर व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, कोरोना आणखी गेला नसल्याने संभाव्य धोखा लक्ष्यात घेऊन या वर्षी चा जिल्हा परिषद मैदानावरील रावण दहनाचा कार्यक्रम रद्द केल्याचे सार्वजनिक दसरा महोत्सव समिति प्रमुख ऍड गुलाब पटवारी यानी उदगीर समाचार सोबत बोलताना सांगितले
• श्रीनिवास मदनलाल सोनी