कोव्हिड ने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे - जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. उदगीर:- कोव्हिड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास रुपये 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णया अन्वये जिल्ह्यातील कोविड-19 आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनानाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने ऑनलाईन वेब पोर्टल (Online web portal) विकसित केले असून, याद्वारे कोव्हिड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह अर्थसहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. यासाठी अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील. तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm या वेबलिंकवर देखील ऑनलाईन अर्जाची लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास, त्याच्या आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल. केंद्र शासनाच्या आयसीएमआर ज्यांच्या कोव्हिड-19 मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल. इतर प्रकरणी, कोव्हिड-19 मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील. अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील. अर्जदाराची आधारकार्ड प्रत (पीडीएफ/जेपीजी), मृत व्यक्तीची आधार कार्डची प्रत (पीडीएफ/जेपीजी), जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ/जेपीजी), अर्जदाराचा आधार लिंक केलेला बॅंक खाते क्रमांक , अर्जदाराच्या खात्याची रद्द केलेली चेकची (Cancel Cheque) प्रत (पीडीएफ/जेपीजी), मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (पीडीएफ/जेपीजी), RT-PCR report copy OR CT Scan copy or Any other Medical Documents (pdf/jpg) जेंव्हा कागदपत्र क्र.६ उपलब्ध नाही. जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र. सार्वजनिक आरोग्य विभागा अन्वये जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीकडे (जिल्हा शल्य चिकित्सक - सदस्य सचिव यांचेकडे) अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज सात (7) दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील, जेणे करुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC SPV) येथून अर्ज करू शकतील.
Popular posts
शिवसेना उदगीर नगरपालिका स्वबळावर लढणार= मा. आमदार सुधाकर भालेराव 👉 नगरविकास खाते एकनाथ शिंदे कडे असल्याने शिवसेना उदगीर चा विकास भूतो न भविष्यती करू 👉 नगरपालिका हद्दीतील भ्रष्टाचार मिटवणार 👉 मुस्लिम समाजाला सोबत घेऊन विकास करू 👉 मागील काळातील विकास माझ्या कार्यकाळातील 👉 केलेल्या कामाची प्रसिद्धी न केल्याचे खंत 👉उदगीरकराच्या हितासाठी,सर्वांगीण विकासासाठी मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलो असून मी आता गप्प बसणार नाही 👉 उदगीर, अहमदपूर नगरपालिका निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढवणार असून जनतेनी आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन सहकार्य करतील असे सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे
Image
कृषी उत्पन्न बाजार समितीस सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर ,बाजार समितीच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - शिवाजीराव हुडे उदगीर = उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची होणारी सोयाबीन खरेदी विक्रीच्या संदर्भातली अडचण विचारात घेऊन, सोयाबीन खरेदी केंद्र आपल्याकडे मिळावे. अशी मागणी पणन महामंडळाकडे केली होती. लोक कल्याणकारी योजनेचा भाग म्हणून पणन महामंडळाकडून उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या सोयीसाठी म्हणून सोयाबीन खरेदी केंद्राला मंजुरी दिली आहे. मंजुरीचे अधिकृत पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला प्राप्त झाले असून त्या पत्रानुसार सोयाबीन खरेदी केंद्र उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या सोयाबीनच्या नोंदी करून घ्याव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समितीला सक्रिय होऊन काम करता येईल
उदगीर नगरपालिकेवर युतिचा झेंडा फडकेल = बस्वराज पाटील मुरूमकर 👉 आत्ताच विरोधकांची झोप उडाली उदगीर= उदगीर नगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकणार असल्याने विरोधकांची झोप उडाली असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील मुरूमकर यांनी उदगीर समाचार ला बोलताना सांगितले आहे उदगीर येथे युतीच्या उमेदवारा ची माहिती देण्यास बोलावलेल्या पत्रकार परिषदे नंतर उदगीर समाचार सोबत बोलताना पाटील म्हणाले की उदगीर नगर पालिके वर युती चा झेंडा फडकणार असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,आज विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत, देशात भाजप्,राज्यात युती चे सरकार असून आम्ही जो विकास केला आहे ते जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, उदगीर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदा वर स्वाती सचिन हुडे व आमचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार या न भूतो न भविष्ती अशा मतांनी विजयी होतील यात आम्हाला शंका नाही असेही ते म्हणाले या वेळेस आ संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. संजय बनसोडे, मा. आ.गोविंद केंद्रे सह अनेक मान्यवर उपस्थित होते
Image
उदगीर नगरपालिकेत सत्ता पालट ? 👉 अनेक माजी नगरसेवकाची नाराजी भोवणार ! उदगीर:- उदगीर नगरपालिकेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर असून आता नामांकन दाखल करण्यासाठी सर्वच पक्षाकडून मोर्चे बांधणी चालू असून काही पक्ष हवेत आहेत की आम्ही जो उमेदवार दिला तो निवडून येईल हे त्यांचे भ्रम दिसत असून जश्या निवडणूक निरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या तश्या प्रभागात जाऊन तेथील मतदाराच्या ही प्रतिक्रिया घेतल्या असत्या तर चांगले झाले असते असे मतदार बोलत आहेत या वरून ज्या माजी नगरसेवका बद्दल रोष आहेत त्याचा फटका अनेक पक्षाला बसण्याची शक्यता दिसत आहे,शहरात होत असलेल्या गुप्त बैठकीचा सारांश घेतला तर ज्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार सक्षम असेल त्याचा झेंडा नगरपालिकेवर फडकेल असे दिसत असून पुढील दोन दिवसात हे स्पष्ट होईल
ठरलं भाजप राष्ट्रवादी ? नगराध्यक्ष भाजप, भाजप 18 राष्ट्रवादी 19 अन्य 3 फॉर्म्युला? उदगीर:- उदगीर नगरपालिका निवडणुकीत आता भाजप राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांची युती संदर्भात फायनल बैठक झाल्याची चर्चा असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पद भाजप ला तर त्या बद्दल राष्ट्रवादी ला एक नगरसेवक जास्त असल्याची चर्चा सूत्र करत आहेत तर राष्ट्रवादी ला प्रभाग 1,2,3,4,5,6,10,11,12 आणि 13 तर भाजप ला प्रभाग 7,8,9,14,15,16,17,19,20 मिळेल अशी चर्चा आहे,तर 18 मधून 2, 20 मधून 1 ही जागा अन्य देण्यात येईल अशी ही सूत्रांची माहिती असून हा अंदाज आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे , होऊ शकते उदगीर समाचार चा अंदाज खरा ठरतो किंवा खोटा हे लवकरच समजेल