*राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू* *रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी* *सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध* ----------- उदगीर समाचार *कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*   उदगीर:-राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे. आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील. ·         संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल. ·         लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. ·         इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते. ·         उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल. ·         क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल. ·         वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल. ·         उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. ·         याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील. ·         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील. ...
Popular posts
राष्ट्रीय मराठा पार्टी चा युती ला जाहीर पाठिंबा उदगीर=राष्ट्रीय अध्यक्ष यांनी श्री. अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी राष्ट्रीय मराठा पार्टीचा नगरपरिषद नगरपरिषद निवडणूक 2025 स्थानिक स्वराज्य संस्थां महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद व नगर पंचायत निवडणूकीत भाजप व राष्ट्र वादी श्री.अजीत पवार गटाला निवडणून आणुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उदगीर नगर परिषदचा विकास करण्यासाठी उदगीर नगराध्यक्ष भाजपा चे उमेदवार सौ.स्वाती सचिन हुडे व राष्ट्र वादी श्री.अजीत पवार गटाचे उदगीर चे माजी मंञी आमदार मा.आ.संजयजी बनसोडे व भारतीय जनता पार्टी/राष्ट्रवादी अजित पवार गट या सर्व नगर परिषद/नगर सेवकास राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठींबा. 1)बनसोडे मंजुश्री शशिकांत.2) कसबे धिरज पांडुरंग 3)शेख सना जफर 4)सय्यद इम्रान पाशा 5)बोईनवाड व्यंकटराव भिमराव 6)कपाळे गंगाबाई गरुनाथ 7)भालेराव राजकुमार श्रीपती 8)मुदाळे मणकर्णा अनिल 9)शेख फायाजोदिन नसीरुद्दीन 10)उप्परबावडे शिल्पा मल्लिकार्जुन 11)कुरेशी आलिया फिरदौस अबरार पठाण 12)सय्यद रेश्मा खटिया इमरोज 13)मनोज रामदास पुदाले 14)छाया बस्वराज बागबंदे 15) निकीता व्यंकटराव अंबरखाने 16)राजकुमार संग्राम हुडगे 17)सांगवे निवृत्ती संभाजी 20)शेख नुरजहा इस्माईल 21)शेख शाहजहांपुर बेगम रहीम साब 22]पठाण फैजमुहमद गुलाम 23)सुर्यवंशी अमरनाथ हरिकिशन 24)सय्यद खुर्शीदबी हनीफसाब 25)शिंदे शीतल नरसिंग 26)मुदाळे अनिल नागोराव 27)विद्या आनंद बुंदे 28)साईनाथ माधवराव चिमेगावे 29)नागेश रमेश अष्टुरे 30)भारती सुधीर भोसले 31)मीरा बाबुराव येलमेटे 32)दत्ताजी व्यंकटराव पाटील 33)महापुरे भगीरथ समर्थ 34)विजय राजेश्वर निटुरे 35) शेख समिरोद्दिन अलीमुद्दीन 36)मीना चंद्रकांत कोठारे 37)अंजली सावन पस्तापुरे 38)शहाजी भगवानराव पाटील 39)गोकर्ण गणेश गायकवाड 40)पाटोदा बाळु शंकरराव यांना निवडणुन आणुनया राष्ट्रीय मराठा पार्टी यांच्याकडुन भाजपा/राष्ट्रवादी श्री अजित दादा पवार पार्टी सोबत आहोत म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठींबा घोषित केला आहे, या वेळेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.रामचंद्र भांगे, अखिल भारतीय मराठा महासंघ उदगीर ता.अध्यक्ष देविदास चिकले इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Image
अपनी राधाकृष्ण गौशाला लातूर के कैलेंडर का विमोचन उदगीर की नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. स्वाती सचिन हुडे के हाथो संपन्न उदगीर:- लातूर की प्रसिद्ध अपनी राधा कृष्ण गौशाला प्रतिष्ठान लातूर के 2026 कैलेंडर का विमोचन अभी-अभी भारी बहुमत से चुनके आए भाजपा उदगीर के नवनिर्वाचित नगर अध्यक्ष सौ.स्वातिताई सचिन हुडे उनके हाथों से किया गया इस समय गौ भक्त सौ मीरा झंवर,अनिल झंवर,लक्ष्मीकांत कालिया, सत्यनारायण सोनी , शिवाजीराव हुडे आदि
Image
*दर्शवेळा अमावस्यानिमित्त लातूर जिल्ह्यात 19 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी* उदगीर : जिल्ह्यासाठी 2025 मधील तीन स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी 20 जानेवारी, 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार जाहीर केल्या आहेत. त्यानुसार 19 डिसेंबर 2025 (शुक्रवार) रोजी दर्शवेळा अमावस्या निमित्त जिल्ह्यात स्थानिक सुट्टी राहणार आहे. लातूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये व बँकेच्या कक्षेतील कार्यालये वगळता लातूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेच्या कक्षेतील कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, जिल्ह्यातील कोषागारे, महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना ही सुट्टी लागू राहील.
रामकथाचार्य शशिशेखर महाराज यांच्या रामकथेस उसळला जनसागर उदगीर= येथील सिग्नल नंबर 2,हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित शशिशेखर महाराज यांच्या रामकथेची 29 नोव्हेंबर शनिवारी रोजी भव्य सुरुवात झाली असून सदरील रामकथेचे 7 डिसेंबर रविवार रोजी समापन होणार असून ही कथा दररोज दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंत सुरू आहे,या रामकथेस भक्ताचा जनसागर उसळला असून सर्व परिसर राममय झाल्याचे दिसून येत आहे,सदरील परिसरातील रहिवाश्यांनी या कथे चे आयोजन केले असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे
Image
मोटारसायकल विकून फसवणूक,धमकी गुन्हा दाखल उदगीर:- शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की राहुल पंढरी बिरादार वय 30 वर्ष रा -हंचनाळ ता देवणी जि.लातूर यास आरोपी अविनाश गंगाराम कांबळे रा -कुमठा खुर्द ता उदगीर जि लातुर. यांनी फिर्यादीस स्पेंलेडर गाडी क्र एम एच 24 बीपी 2248 विक्री करतो म्हणुन एकुन 55000 रुपये घेवुन बाउंड वर साक्षीदारासमक्ष नोटरी करुन दिले की, एमएच 24 बीपी 2248 गाडीवर कोणत्याही प्रकारचा अपघात RTO दंड पोलीस केस कोणत्याही कंपनीचा फायनस कर्ज बोजा नाही असल्यास त्याला मी जबाबदार राहील असे लिहुन दिले होते या गाडीवर 22000. रुपये फायनास आहे आरोपी यास माझी फसवणुक का केली अशी विचारणा केली असता खुप शहाणा झालास का रे तगंड तोडुन टाकीन साल्या जर जास्त शहानपणा केलास तर तुझ्यावर अॅट्रासिटी ची केस करतो म्हणुन धमकी दिली आहे वगैरे मजकुर फिर्याद जबाब वरुन मा.पो.नि.सो यांचें आदेशाने गुन्हा र. नं .405/25,कलम 318(4),351(2)(3)BNS दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि मोहीते हे करीत आहेत.