राष्ट्रनिर्माण,धर्मरक्षणार्थ मुलाना संस्कार द्या:- आचार्य श्री रामदयालजी महाराज :- शाहपुरा जिल्हा भीलवाड़ा(राजस्थान) येथील रामनिवास धाम येथे पाच दिवसीय फूलडोल महोत्सव मोठ्या उत्साहात सम्पन्न :- लाखो भक्ताचा उसळला जन सागर उदगीर:- शाहपुरा राजस्थान येथील रामनिवास धाम येथील पाच दिवसीय फूलडोल उत्सव दररोज गुरु वाणी पाठ, आचार्य श्री चे प्रवचन,वाणी जी चा जुलूस अस्या विविध कार्यक्रमानी सम्पन्न झाला,आज फूलडोल महोत्सवाच्या पाचव्या दिवसी अचार्य श्री रामदयाल जी महाराज यानी भक्ताना संबोधित करताना म्हणाले की आज आपला धर्म आणि राष्ट्र मोठ्या संकटात आहे,राष्ट्र निर्माण आणि धर्म रक्षणासाठी प्रत्येकानी आपल्या मुलास संस्कार देने जरूरी आहे,आज तुम्ही संस्कार दिलात तरच उद्या ही नवीन पीढ़ीच धर्माचे रक्षण करेल व राष्ट्र निर्माण करेल,राम नामाची ताकद सर्व जगाने ओळखली आहे,आज जर कोनी तारू शकते ते फ़क़्त राम नामाचे स्मरण ही असे आचार्य श्री म्हणाले,या फूलडोल महोत्सवासाठी देश विदेशातून व महाराष्ट्र भरातून रामस्नेही भक्त रामनिवास धाम येथे उपस्थित होऊन फूलडोल महोत्सवाचा आनंद घेतला
• श्रीनिवास मदनलाल सोनी