डाॅ,शंभुलिंग महाराजांचा एक आक्टोंबर रोजी सत्संग सोहळा उदगीर = श्री गुरु हावगीस्वामी मठात एक आक्टोंबर रोजी ष.ब्र.108 डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांचा सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्र संत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे प्रेरणेने श्री गुरु हावगी स्वामी पोरौहितकार मंडळ उदगीर,श्री गुरु हावगी स्वामी युवक मंडळ व महिला भजनी मंडळ यांच्या वतीने दर महिन्याच्या एक तारखेस श्री गुरु हावगी स्वामी मठ संस्थानचे मठाधिश ष.ब्र.108डाॅ,शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन श्री गुरु हावगी स्वामी मठ येथे शनिवार दि.एक आक्टोंबर 2022 दुपारी ठिक एक वाजता हा सत्संग सोहळा संपन्न होणार आहे. सत्संगाचे यजमान सौ.पदमिनबाई विश्वनाथ पाटिल हे आहेत.या सत्संग सोहळ्यास भाविक भक्तानी उपस्थित राहुन आशिर्वचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
