साहेब दारूचे दुकानें बंद करा, सोमनाथपुर येथील महिलांचा पूर्व राज्यमंत्री संजय बनसोडे याना साकडे ! उदगीर=उदगीर चे उपनगर सोमनाथपुर येथिल पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राज्यमंत्री तथा उदगीर चे आमदार संजय बनसोडे यांच्या समोर उपस्थित महिलानी आक्रोश करत गावातील अवैध दारू दुकाने त्वरित बंद करण्याची मागणी केली! उदगीर चे उपनगर सोमनाथपुर असून या गावात 5 ते 6 दारू चे अवैध दुकानें चालू असून गावातील लहान लहान मुले ते वृद्ध दारूच्या आहारी गेले असून या मुळे गावातील वातावरण हे दूषित होत आहे, प्रशासनाकडे अनेक तक्रारी करून ही या दारू दुकानावर काहीच कार्यवाही होत नाही हे पाहून गावातील महिलांनी सोमनाथपुर येथील जलजीवन मिशन अंतर्गत 13करोड़ 74 लाख रुपयाच्या पानी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन समारंभास उपस्थीत पूर्व गृह राज्यमंत्री तथा येथील आमदार संजय बनसोडे यांच्या समोरच महिलांनी दारू दुकान बाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने काही वेळ त्यांना सुद्धा हे काय होतंय समजले नाही, आमदार संजय बनसोडे यांनी या बाबत लक्ष देउन त्वरित सूचना करतो म्हणाल्या नंतर ही या महीला आक्रमक होत आमदाराची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला , चौकट= कुठे आहेत ते टी शर्ट वाले ! दारू दुकाना बाबत उपस्थीत महिलांचा आक्रोश वाढत असल्याने पूर्व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी गुन्हे शाखे च्या कर्मचाऱ्यांना उद्देशून कुठे आहेत ते टी शर्ट वाले बोलवा त्यांना म्हणाले पण तेथे एक ही गुन्हे शाखेचां कर्मचारी उपस्थित नसल्याने आमदाराची ही पंचायत झाल्याचे दिसत होते कारण गुन्हे शाखेचे पोलिस हे टी शर्ट घालून काय काय कामे करतात हे आमदारांना समझले आहे? = उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन च्या हद्दीत दारू, मटका, जुगार हा जोमात सुरू असून अश्या अवैध धंद्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लातूर हून येऊन धाडी टाकल्या पण हे अवैध धंदे ग्रामीण पोलीस स्टेशन च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कसे दिसत नाही हा प्रश्न जनतेला पडला आहे?
• श्रीनिवास मदनलाल सोनी
