उड्डाणपुलावरील लाईट व शहरातील हेरिटेज पोलच्या कामाचा आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते शुभारंभ। उदगीर =आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर शहरातून मुख्य रस्त्यावर जाणाऱ्या दोन्हीही बिदर रोड व नळेगाव रोड वरील उड्डाणपुलावरच्या लाईट आजपर्यंत बसवल्या नव्हत्या ,रात्री बेरात्री लाईट नसल्यामुळे अनेक अपघात व धोक्याचे ठिकाण बनले होते ,अनेक माध्यमवर्गातून दोन्ही पुलावरील लाईट मंजूर करण्यासंदर्भात मागणी होत होती आमदार संजय बनसोडे यांनी या मागणीला प्राधान्याने जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरा करून शहरातील उड्डाणपुलावरील लाईट व त्याचबरोबर शहरांमध्ये सुसज्ज होत असलेल्या रस्त्याच्या मधोमध दुभाजकांमध्ये हेरिटेज लाईट लावण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला व यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर करून घेऊन आज प्रत्यक्ष या कामाला सुरुवात केली त्याबद्दल सर्व माध्यमातून त्यांचे आभार व अभिनंदन केले जात आहे या उद्घाटन कार्यक्रमस माजी नगराध्यक्ष राजेश्वर नीटुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील ,उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक शिवाजी मुळे ,जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पाटील नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या पण संख्येने उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
