सामुदायिक दसरा महोत्सव समिती ची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न :- दसरा महोत्सव श्रधेने आणि उत्साहात साजरा करा संजय बनसोडे उदगीर:- उदगीर येथील सामुदायिक दसरा महोत्सव समिती ची बैठक राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली तर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री शंकरअप्पा मठाचे प्रमूख सुखदेव स्वामी होते उदगीर येथील सामुदायिक दसरा महोत्सवाची बैठक श्री शंकरअप्पा मठा मध्ये या महोत्सव समिती चे अध्यक्ष श्री सुखदेव स्वामी यांच्या अधक्ष्य ते खाली तर पूर्व राज्यमंत्री तथा येथील आमदार श्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली,या बैठकीत मागील दोन वर्षांपासून दसरा कोरोना मुळे शासनाच्या वतीने दिल्या अदेश्या नुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता,या वर्षीचा दसरा महोत्सव हा उत्साहात आणि श्रद्धा पूर्वक साजरा करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले, या वेळेस पूर्व राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दसऱ्या निमित्त दसरा मैदानात सर्व सुविधा नगरपालिकेने कराव्यात अश्या सूचना मुख्याधिकारी याना दिल्या असून,या वर्षीचा दसरा महोत्सव हा मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे महोत्सव समिती ने जाहीर केले असून या बैठकीस अधक्ष सुखदेव स्वामी, कार्याधक्ष उद्धव महाराज हैंबतपुरे,सचिव ओमप्रकाश गर्जे, उपाधक्ष चंद्रकांत वैजापूरे,सहसचिव पांडुरंग आपटे, कोश्याधक्ष अविनाश रायचुरकर, प्रसिध्दी प्रमुख मोतीलाल डोईजोडे,सुभाष धनुरे,नामदेव आपटे,संतोष कुलकर्णी, अड श्रीकांत बडीहवेली, कृष्णकांत बेद्रे,मनोहर पाटील, माधव उगीले, राजकुमार तांदळे, आनंद साबणे,श्रीनिवास सोनी,कैलाश पाटिल, माणिक खडके,अनुप मोरे आदी उपस्थित होते, बैठकीत सर्व पालखी धारकानी सायंकाळी 6 च्या पहले दसरा मैदानात यावे व सर्वाँना सहकार्य करावे असे आवाहन समिती चे अधक्ष श्री सुखदेव स्वामी यांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
