श्री तुळजाभवानीची दुपारी १२.०० वाजता होणार विधीवत घटस्थापना उदगीर - तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव २०२२ दि.१७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. तर उद्या सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी पहाटे व सकाळी श्रीदेवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य व दुपारी १२.०० वाजता घटस्थापना तर सायंकाळी अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. या महोत्सवात दि.२६ सप्टेंबर ते दि.१० ऑक्टोबरपर्यंत विविध धार्मिक, विधी व सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवगावकर यांनी दिली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई शक्ती देवता श्री तुळजाभवानी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी शारदे नवरात्र महोत्सव २०२२ ची दि.१७ सप्टेंबरपासून सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रेपासून महोत्सवास सुरुवात झाली आहे. सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते व सर्व मानकरी, पुजारी व पाळेकरी यांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे. तर मंगळवार दि.२७ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीचीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्री छबिना मिरविण्यात येणार आहे. तसेच बुधवार ‌दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा नैवेद्य आरती व रात्री छबिना काढण्यात येणार आहे. तर गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी श्रीदेवीची अभिषेक पंचामृत रथ अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती व सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी ललित पंचमी दिनी श्री देवीजींची पंचामृत मुरली अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर शनिवार दि. १ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत शेषशाही अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच रविवार दि.२ ऑक्टोबर रोजी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत भवानी तलवार अलंकार महापूजा, नैवेद्य, आरती, सायंकाळी अभिषेक आरती व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर सोमवार दि.३ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी दिनी श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा सायंकाळी ११.३० वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ तर दुपारी ४.४५ मिनिटांनी पूर्ण होतील व रात्रीचे छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी महानवमी (खंडे नवमी) श्री देवीजींची नित्योपचार महापूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर अजाबली आपली व घटोत्थापन (घट उठविणे) दिवसभर नैवेद्य, दर्शन व रात्री पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) उष:काली श्री देवीजींची शिबिकारोहन, मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा विजयादशमी सार्वत्रिक सिमोल्लंघन तसेच रविवार दि.९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा दिनी पहाटे श्री देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना नित्योपचार पूजा ,अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, आरती व रात्रीचा छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमा व सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळा श्री देवीजींची अभिषेक पंचामृत महापूजा, नैवेद्य, सोलापूर काठ्यासह आरती व रात्रीचे छविना मिरवणूक काढण्यात येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिरात धार्मिक पूजा, विधी व सेवा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहेत. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय तुळजाभवानीच्या ऑनलाईन दर्शनासाठी Online Puja - seva visit at WWW.shrituljabhavani.in या संकेतस्थळावरुन दर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image