कले ची खान आहे माहेश्वरी समाज=ब्रम्हाकुमारी महानंदा बहनजी उदगीर येथिल श्री लक्ष्मीनारायण मंदिर येथे तृप्ती मुंदडा आणि प्रा. स्मिता लखोटिया,स्वाती लखोटिया यांच्या तृप्ती क्रिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या हस्त निर्मित दिवे, आकाश कंदील व अन्य साहित्याचे प्रदर्शन सोमवार, मंगळवार या दोन दिवशी केलें असून या प्रदर्शनाचे उद्घाटन आज सोमवारी ब्रम्हाकुमारी महानंदा बहनजी यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार श्री रामेश्वर गोरे, माहेश्र्वरी सभे चे मार्गदर्शक डॉ रामप्रसाद लखोटिया, ईश्वरप्रसाद बाहेती सभे चे अधक्ष विनोदकुमार टवानी, महिला मंडल सौ.अध्यक्ष अनिता बलदवा, सौ.रामकन्या बाहेती, सौ. हेमलता सोनी, सौ कोमल मुंदडा, सौ शीतल बजाज, सौ. गीतांजलि सोनी सौ गोरे, डॉ स्वामी, मंजुषा, मीना, संगीता, तेजाबाई, शीला, अविका, सुमित,इम्रान सह अनेक मान्यवर मोठ्या संखेने उपास्थित होते या वेळेस महानंदाबहन जी म्हणाल्या की माहेश्र्वरी समाज कलेची खान आहे , हे हस्त निर्मित दिवे, आकाश कंदील,पणत्या या दिवाळीत आणखी उजळतील,या प्रदर्शनास शहर व ग्रामीण भागातील कला प्रेमी ने अवश्य भेट द्यावी जेने करुन हे हस्त निर्मित प्रदर्शन आयोजित करणाऱ्यास प्रोत्साहन मिळेल, तहसिलदार रामेश्र्वर गोरे यांनी पुढील वर्षी असे हस्त निर्मित प्रदर्शन मोठया प्रमाणात आयोजन करावे अणि या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा जेणे करून अश्या हस्त निर्मित दिवे, आकाशकंदील,पणत्या निर्माण करणाऱ्यास प्रोत्साहन मिळेल अणि त्यांना रोजगार ही मिळेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
