सोनू उर्फ सिद्धार्थ भोसले, औदुंबर भोसले यांना सर्वोच्च न्यायालयात जामीन मंजूर. =: उदगीर येथील सोनू उर्फ सिद्धार्थ भोसले, औदुंबर भोसले यांना मा. सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्या. सूर्य कांत आणि मा. न्या. एम. एम. सुंदरेश यांनी कायम अटकपूर्व जामीन देण्याचे आदेश त्यानी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेत दिले आहेत. प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की माजी नगरसेवक नागेश अष्टुरे यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे सोनू भोसले, औदुंबर भोसले, माजी उपनगरध्यक्ष सुधीर भोसले या इतर यांच्या विरोधात मी वार्डात काम करत असताना जबर मारहाण केली तसेच सोन साखळी हिसकावून घेतली या आशयाच्या फिर्यादी अंती सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला. सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी सोनू भोसले आणि औदुंबर भोसले यांना चार आठवड्याचे अंतरिम जामीन देऊन मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्याची मुभा दिली. सोनू भोसले यांनी ऍड. सुधांशु चौधरी आणि ऍड अजिंक्य रेड्डी यांच्या मार्फत मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली. सदर याचिकाकर्ते हे व्यवसायाने सराफ असून सोन साखळी चोरी चे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत, तसेच मूळ फिर्यादी नुसार फिर्यादी आणि याचिकाकर्ता दोन्ही राजकीय पार्श्वभूमी असणारे आहेत म्ह्णून सदर प्रकरणी नजीकच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता खोटा गुन्हा दाखल करण्याची दाट शक्यता आहे असा युक्तिवाद मा. सर्वोच्च न्यायालयासमोर ॲड. सुधांशु चौधरी आणि ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी मांडला. मा. सर्वोच्च न्यायालयाने युक्तीवाद गृहीत धरत याचिका कर्त्यांना कायम अटकपूर्व जामीन देण्याचे आदेश त्यानी दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेत दिले आहेत. सदर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयात ॲड. सुधांशु चौधरी आणि ॲड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहीले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी