कृ. उ. बा. समिती सचिवावर अटकेची टांगती तलवार ? उदगीर = येथील प्रसिद्ध व्यापारी तथा कृ. उ. बा. समितीचे माजी सभापती शिवाजीराव हूडे यांनी उदगीर पोलीस ठाण्यात लिखित तक्रार दिली असून कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर चे सचिव व इतरांनी 2019-2020 साली माइया नावाने परवान्याची मागणी केलेली नसताना किंवा नंतर परवाना नूतनीकरण करून मागीतले नसताना माइया बोगस सहया करून माझ्या नावाने मे. एस. एच. हुडे या फर्मची नुतनीकरण माझ्या नावे बेकायदेशीरपणे केलेले आहे. सचिव यांनी माझ्या राजकिय विरोधकाना हाताशी धरून हा बेकायदेशीर प्रकार केलेला आहे. मी सन 2012 ते 2016 मध्ये सदर बाजार समिती मध्ये शेतकारी मतदार संघातून निवडून येउन सभापती म्हणून काम केलेले होतें माइया राजकीय विरोधकांना मि यापुढे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवता येउ नये म्हणुण माइया नावाने सचिवाला हाताशी धरून बेकायदेशीरपणे परवाना काढला , नूतनीकरण केलेले आहे. या बाबत समितीकडे परवाना नुतनीकरणाचे कागदपत्र मागनी करून त्या कागदपत्राची तपासणी केल्यावर मला असे दिसले की सन 19-20 ची नुतनीकरण अर्ज नाही व सन 20-21 चे नुतनीकरण अर्जावर सहीच नाही तसेच सन 21-22 चे नुतनीकरण अर्जच नाही व तसेच सन 22-23 च्या मागनी अर्जावर बोगस सहया करून परवाना नूतनीकरण केल्याचे दिसून आले आहे, सचिवाचे हे कृत्य फसवणुकीचे असून या मुळे मला मार्केट ची निवडणूक लढवता येणार नाही असे कृत्य यांनी केले असून या प्रकरणाची चौकशी करून भारतीय दंड संहितानूसार सचिव व संबंधीत व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करावा व मला न्याय द्यावा अशी तक्रार उदगीर पोलीस ठाण्यात केल्याने आता या तक्रारीवर सचिवावर व अन्य कोणावर कार्यवाही होणार किंवा सचिवासह अन्य वर अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा सध्या मार्केट यार्डात चौका चौकात चालू असल्याचे दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी