उदगीर तसिल मधील लिपिक दुसऱ्यांदा अडकला दोन हजाराची लाच घेताना जाळ्यात उदगीर=प्रशांत अंबादासराव चव्हाण, वय 48 वर्ष, पद - महसूल सहायक (लिपिक), नेमणूक- तहसिल कार्यालय, उदगीर ता.उदगीर, जि.लातूर *(आरोपी लोकसेवक प्रशांत चव्हाण यांचेवर यापूर्वी 2016 साली लाप्रवि लातूर कार्यालयाकडून लाच स्विकृती यशस्वी सापळा कारवाई झालेली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आलोसे वर आज दुसऱ्यांदा यशस्वी सापळा कारवाई झालेली आहे यातील तक्रारदार यांचे भाऊजी वर गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्ह्यात तक्रारदारांचे भाऊजी च्या जामीना करीता सॉलव्हन्सी लागणार असल्याने, त्यांचे वडील निवृती गायकवाड यांचे नावे सॉलव्हन्सी काढणे कामी आलोसे कडे तक्रारदाराने अर्ज केला असता आलोसे यांनी सॉलव्हन्सी (ऐपतदारी प्रमाणपत्र) काढून देण्याचे कामासाठी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. आलोसे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे मागणी केलेली लाचेची 2,000/- रु. रक्कम देण्यासाठी तहसिल कार्यालय, उदगीर येथील महसूल विभाग येथे गेले असता आलोसे यांनी स्वतः चे कार्यालयात पंचासमक्ष लाचेची रक्कम स्विकारली. आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून सदर बाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र, नांदेड धरमसिंग चव्हाण,अपर पोलीस अधिक्षक,ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र, नांदेड लातूर चे पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. लातूर. या पथकात अन्वर मुजावर व भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. लातूर आणि ला.प्र.वि. लातूर येथील टीम आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी