युवकांनी केला आदर्श स्थापित , केली स्मशान भूमी ची सफाई! उदगीर= केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हे ब्रीद वाक्य घेऊन माहेश्वरी समजातील 9 युवकांनी स्मशानभुमी ची सफाई करून एक आदर्श निर्माण केला आहे उदगीर येथील मारवाडी समाज हा अल्पसंख्याक असल्याने या समाजात वर्षात किंवा दोन वर्षांत एका मृत्यू ची घटना होते, या वेळेस स्मशान भूमीत जाण्याचा योग येतो तेंव्हा स्मशानभुमीत सगळी कडे घान , झाडे झुडपे पसरलेली असतात तेंव्हा तेथे उपास्थित मृताच्या नातेवाईकांना तेथे उभे राहणं ही अवघड होते हे पाहून दिवाळी मिलन सोहळ्यात गोपाल मणियार यांनी स्मशान भूमी साफ करण्याचे बोलून दाखवले ,त्यास प्रतिसाद देत अमोल बाहेती, अनील मालू, रुपेश राठी, कृष्णा काबरा, भगीरथ सोमाणी, श्रीकांत सोमाणी, सूरज मोदानी,शुभम लोया या युवकांनी सोमवारी सकाळी एकत्र येतं स्मशानभूमी ची सफाई करून समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे, त्यांचें सर्व स्तरातून स्वागत होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
