*अखेर अँटीकरप्शनचा खोटा गुन्हा केला उच्च न्यायालयाने रद्द...तत्कालीन गटविकास अधिकारी श्री.अंकुश चव्हाण निर्दोष* मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादचा ऐतिहासिक निर्णय. सविस्तर वृत्त असे की 15 जुलै 2020 रोजी पंचायत समिती उदगीर येथील काही पदाधिकाऱ्यांनी श्री.अंकुश चव्हाण तत्कालीन गट विकास अधिकारी उदगीर हे नियमबाह्य कामे करत नसल्यामुळे तक्रारदार श्री नामदेव भोसले सरपंच पती( कुमदाळ हेर) यांना पुढे करून अँटीकरप्शन चा खोटा गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्हा खोटा असल्याकारणाने श्री अंकुश चव्हाण यांना यापूर्वीच मा.उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनही मंजूर केला होता. याच प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याने हायकोर्ट मध्ये न्यायासाठी धाव घेतली होती. त्या प्रकरणात आज अखेर मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबादने अँटी करप्शनचा गुन्हाच खोटा आहे असे ताशेरे ओढून उदगीर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदविलेला *संबंधित गुन्हाच रद्द केला* यामुळे उदगीर तालुक्यातील कर्मचारी व नागरिकांमध्ये *सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही* अशी चर्चा होत आहे. श्री अंकुश चव्हाण यांची सामान्य नागरिकांची अडचण जाणणारा अधिकारी म्हणून ओळख होती.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
