खबऱ्याच्या पत्नीला पोलिसांची अमानुष मारहाण, महिलेने केली ऑनलाईन तक्रार! उदगीर शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी एडके, साठे यांच्या सांगण्यावरून पुल्लेवाड यानी बुटाने लाता, तोंडावर चापटा तर सुंदरीने अनेक ठिकाणी अमानुष मारहाण केल्याची ऑनलाइन तक्रार मुख्यमंत्री,विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड, पोलिस अधिक्षक लातूर यांच्या कडे केल्याने मारहाण करणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणल्याचे चित्र दिसत आहे पूजा दिनेश दामवाले यानी उदगीर समाचार ला सांगितले की माझे पती दिनेश हे पोलिसांचे खबरी असून दिनेश यानी गुरुवार 15/12/2022रोजी दिवसभर मद्य विक्री ग्रामपंचयत निवडणुकी मुळे बंद असल्याने अनेक जण अवैध मद्य घेऊन जात असताना पोलिसाना कळवले ते मद्य पोलिसांनी पकडुन आपला खिसा गरम करून घेतला , त्या रात्री गल्लीत भांडण होत असल्याने पूजा ने शहर पोलिस ठाण्यास माहिती देऊन पोलिस वाहन बोलावले असता सहायक पोलिस निरीक्षक एडके यानी पूजा ला ही पोलीस ठाण्यात रात्री घेऊन गेले , सोबत पूजा चा भाऊ होता त्यास पोलिस मारहाण करू लागल्याने पूजा ने जोरात बोलताच एडके व साठे यांच्या सांगण्यावरून पोलिस पुठेवाड यानी खोलीत नेऊन पुजास हातावर बुटाचे पाय ठेऊन सुंदरी ने व हाताने अमानुष मारहाण केली,ही मारहाण रात्री 12ते पहाटे चार पर्यंत झाली एवढी गभिर होती की पूजा बेशुद्ध ही पडली, पूजा ला पहाटे 4=30 नंतर सोडून दिले, पुजाने 16/12/2022रोजी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात जाऊन उपचार ही घेतले त्या नंतर मी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता माझी तक्रार घेतली न गेल्याने सदरील तक्रार मी ऑनलाइन केली असून मला न्याय नाही मिळाल्यास मला विष पिऊन आत्महत्या करावी लागेल अशी तक्रार मुख्यमंत्री,विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड, पोलिस अधिक्षक लातूर यांना दिल्याने अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले असल्याने चित्र दिसत असून एक्या महिलेस रात्री 12 वाजता नेहून अमानुष मारहाण हे कोणत्या कायद्यात बसते किंवा आता या मारहानी संधरबात महीला आयोग काय करते हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

