*उदगीर येथे होत असलेल्या सिमेंट रोड कामाची चौकशी करा !* सा.बां. प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ! =*शाखा अभियंता देशपांडे व उपविभागीय अभियंता देवकर यांच्या हकालपट्टी करुन यांच्या मलमत्ते ची चौकशी करा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती उदगीर : येथिल सीमेंट रोड चे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने औरंगाबाद विभाग गुण नियंत्रण पथकामार्फत चौकशी सह अन्य मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक कार्यालय नांदेड येथे दि.19/12/2022 पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केले आहे. उपोषणातील खालिल मागन्या असुन 1) उदगीर येथील शिवाजी चौक ते तोंडारपाटी सिमेंट रोड कामाची चौकशी व्हावी. 2) शिरूर ताजबंद ते वायगाव पाटीच्या रोड कामाची चौकशी व्हावी. 3) घोणसी ते आतनूर डांबरीकरण रोड कामाची चौकशी व्हावी. 4) सदरिल ठेकेदाराचा परवाना रद्द करून काळया यादीत टाकावे. 5) नेहमी वादग्रस्त असणारे उपविभागीय अभियंता लक्ष्मण देवकर उदगीर यांची तात्काळ हकालपट्टी व त्यांच्या मालमत्ते ची चौकशी करावी. 6) शाखा अभियंता देशपांडे जळकोट यांच्याही मालमत्ते ची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे. 7) चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचे बिल (देयेक) रोखण्यात यावे अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती चे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी, अल्पसंख्यांक मराठवाडा अध्यक्ष शेख अजीम, सविता चप्पलवार, प्रियंका मुद्दामवार, ज्योती वलनंदे, निसार अहेमद, शेख अब्दुल वहाब, मोहम्मद शकील, कासिम जमीनदार, तानाजी भंडे, शेख जुल्फिकार, संजय मुद्दामवार, शेषराव पाटील शेख सैलानी यानी केली असून या उपोषणात अनेक जण सहभागी झाले आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
