उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप, चौकशी साठी बोलावून अमानुष मारहाण, यशवंत जवळगे शिरोळ (जा)यांची गृह मंत्रालया सोबत वरिष्ठां कडे तक्रार शिरोळ जानापुर येथील शेतकरी यशवंत सुंदरराव जवळगे यांचे त्यांच्या मोठया मुलांसोबत वांदे होते ते वांदे मिटवायचे आहेत तुम्ही उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात या म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल एस. के. रंगवाळ यानी 27/12/2022 रोजी बोलाऊन घेऊन पोलिस ठाण्यात अर्वाच्य शिव्या देत सुंदरीने माझ्या हाताच्या तळव्यावर , पायाच्या तळव्यावर अमानूष मारहाण केल्याची तक्रार यशवंत जवळगे यानी, मुख्यमंत्री, गृहमंत्री,विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड, पोलिस अधिक्षक लातूर, उपविभागीय पोलिस अधिकारी उदगीर, उपजिल्हाधिकारी उदगीर यांच्या कडे केलें असून या अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर काही कार्यवाही होतें का किंवा त्यांना त्यांचा वरिष्ठ पाठीशी घालतात हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
