उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, प्रशासनातर्फे सत्कार संपन्न उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी या गावचे सरपंच पदासह एकूण सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत यात सरपंच दुर्गावाढ मीरा पंढरी बीनविरोध तर सदस्य म्हणून गुंडीले रामदास किशन ,चदे सुनंदा हरिदास,जाधव कालिंदा वामन,बंडे प्रशांत गोपीनाथ, गुणाले रंजना नामदेव, गुरमे अनिल माधवराव, दुर्गावाढ मिनाक्षी प्रमोद हे सद्स्य बिनविरोध आले आहेत त्यांचा प्रशासनाच्या वतीने राज्य निवडणूक प्राधिकरत अधिकारी तथा तहसीलदार मा रामेश्वर गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी उपस्थित नायब तहसिलदार संतोष गुट्टे ,संतोष धारशिवकर ,कल्याण पाटील ,विकास साखर कारखाना चे संचालक, निवडणूक निर्णय अधिकारी दंडे व्ही आर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काळे एम पी व मंडळ अधिकारी, गणेश हिवरे ,शंकर जाधव ,तलाठी ,कुलदीप गायकवाड,अमोल रामशेट्टी, पवार देवपीर्य बाबासाहेब कांबळे,हे उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
