नोंदनिकृत ऊस नेला नाही, साखर कारखान्यास उच्च न्यायालयाची नोटिस. उदगीर: मौजे मोराताळवाडी ता. उदगीर येथील शेतकरी बाळासाहेब मोरातळे यांनी त्यांचा मालकीची शेती गट क्र . ३२/१/१ क्षेत्र १ हे. २० आर. मध्ये दि. ७/१२/२०१९ रोजी उसाची लागवड केली होती. सदर उसाची नोंद विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट-२ तोंडार येथे नोंद केलेली होती. त्याअनुषंगाने त्यांना कारखान्याने ऊस नोंद प्रमाणपत्र दिले होते, त्यांचा प्रथम वर्षाचा ऊस कारखाने घेऊन गेला. मात्र दुसरा वर्षाचे ऊस घेऊन जाऊ असे मार्च २०२२ ते मे २०२२ पर्यंत वारंवार आश्वासित केले. तदनंतर संबंधित कारखाना ऊस घेऊन जाण्यासाठी टाळाटाळ करीत होता. शासन निर्णय दि २५/०५/२०२२ नुसार संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू नये अशे आदेश कारखान्यास देणात आले होते. बाळासाहेब मोरातळे यांनी साखर आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले होते. निवेदनांनंतर मा.तहसीलदार यांनी जय मोक्यावर येऊन पंचनामा केला. नोंदणीकृत ऊस कारखान्याने गाळप न केल्याच्या नाराजिने त्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येते ऍड. अजिंक्य रेड्डी यांचा मार्फत रिट याचिका दाखल केली. सदर प्रकरणी प्राथमिक सुनावणी अंती मा. उच्च न्यायालयाचे मा.न्या. मंगेश एस. पाटील, मा. न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी प्रतिवादी साखर कारखान्यास नोटिस बजावण्याचे आदेश देण्यात आले. पुढील सुनावणी १९/०१/२०२३ रोजी होनार आहे. सदर प्रकरणी याचिककर्त्या तर्फे ऍड. अजिंक्य रेड्डी यांनी काम पाहिले त्याना ऍड विष्णु कंदे यांनी सहकार्य केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी