*खासदार सुधाकर श्रंगारे यांची रेल्वे च्या विविध कामासाठी मुख्य कार्यकारी आधिकारी अनिलकुमार लाहोटी यांची घेतली भेट* उदगीर= रेल्वे बोर्डाचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. अनिलकुमारजी लाहोटी यांची खासदार सुधाकर श्रृंगारे, बोर्ड सदस्य श्यामसुंदर मानधना यानी लातुर जिल्ह्यातील विविध रेल्वे विकास कामासाठी दिल्ली येथे भेट घेतली या भेटीदरम्यान लातूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे सुविधांविषयीच्या अनेक मागण्यांवर चर्चा झाल्याचे श्यामसुंदर मानधना यानी सांगीतले रेल्वे सुविधेविषयी केलेल्या मागण्या ⦿ लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाइन तातडीने उभारावी, ⦿ नवीन फ्लॅटफॉर्म उभारण्यासाठी आगामी बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. ⦿ मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचे उद्घाटन पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात यावे. ⦿ मराठवाडा कोच फॅक्टरीच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात यावे. ⦿ दुसऱ्या टप्प्यासाठी आगामी बजेटमध्ये 800 ते 1000 कोटी रुपयांची तरतूद करावी. ⦿ लातूर रोड- नांदेड या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी बजेटमध्ये तरतूद करावी. ⦿ सोलापूर-लातूर-तिरुपती रेल्वेगाडीच्या वेळेत बदल करून लातूर रेल्वे स्टेशनवरून ही गाडी संध्याकाळी 5, 6 किंवा 7 वाजता सोडण्यात यावी. अशा अनेक मागण्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष मा. श्री. अनिलकुमारजी लाहोटी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
