पत्रकार हल्ला विरोधी कृती* *समितीच्या उदगीर तालुका निमंत्रकपदी अर्जुन जाधव यांची नियुक्ती* उदगीर : पत्रकारांच्या विविध समस्या, त्यांच्यावर होणारे हल्ले या विरोधात परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देशभरात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कार्य करते. या समितीच्या उदगीर तालुका निमंत्रक पदी दैनिक दंडाधिकारी चे संपादक अर्जुन जाधव यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शाखाली लातूर जिल्हा निमंञक संगमेश्वर जनगावे यांनी नियुक्ती जाहीर केले आहे. श्री.जाधव गेल्या अनेक दिवसापासुन पञकार ,कामगार ,समाजातील गोरगरीबारवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली आहे. आगामी काळात पत्रकारांच्या समस्या, त्यांच्यावर होणारे हल्ले, खोटे गुन्हे याच्या विरोधात आपण आवाज उठवाल. पत्रकारांची एकजूट व संघटना वाढीसाठी कार्य कराल अशी अपेक्षा" व्यक्त केली आहे.. या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख ,विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, अनिल वाघमारे, अनिल महाजन, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे , उदगीर जिल्हा मराठी पञकार परिषदेचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांनी जाधव यांचं अभिनंदन केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
