उदगीरात बाँड विक्रेत्या कडून जनतेची लूट,प्रशासन मूग गिळून गप्प! उदगीर= उदगीर तालुक्यातील जनतेस उदगीर हे मुख्य केंद्र असल्याने सर्वच व्यवहार येथून करावे लागतात,अनेक शासकिय योजने साठी, बँकेच्या कामांसाठी बाँड द्यावे लागतात,याचाच गैरफायदा येथील बाँड विक्रेते घेत असून 100 रुपयाचा बाँड 120 रुपयांस देत आहेत,काही बोलले की हे बाँड विक्रेते अरेरावी ची भाषा करून जनतेस धमकावत असल्याचे चित्र दिसत असतानाही प्रशासन या बाँड विक्रेत्यांवर कुठलीच कार्यवाही करत नसल्याने एक प्रकारे या बाँड विक्रेत्याचे रोज मनोधर्य वाढत असल्याचे दिसत असून या बाँड विक्रेत्यांवर त्वरीत कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची मागणी होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी