*दावणगाव येथे शेतकरी कार्यशाळा संपन्न* उदगीर =शेतकरी शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ करण्यासाठी नव नवे तंत्रज्ञान, व आधुनिक पद्धतीने शेती करुन शेतकरी सुखी झाला पाहिजे. यासाठी शेतकरी कार्यशाळेचे आयोजन मानवता विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये मा. नाब्दे साहेब क्रृषी अधिकारी उदगीर, मा. मोहन पाटील प्रगतिशील शेतकरी तथा क्रृषी तज्ज्ञ, मा. म्हेत्रे साहेब क्रृषी सहाय्यक, मा. बालाजी कांबळे सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत माती परिक्षणाचे महत्व, सोयाबीन उत्पादन वाढीसाठीचे नियोजन व उपाय योजना , शासनाच्या शेतकरी बांधवांसाठी कोणकोणत्या योजना चालू आहेत याची माहिती, शेतकरी बांधवांसाठी विद्युत बील किती व कसे भरावे तसेच शेतीची वीज तोडणीची नियमावली इत्यादि विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम तीन ते साडेतीन तास चालला. यात गावातील शेकडो शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. लातूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादन वाढीचा विक्रम करणारे दहा शेतकरी यांची उत्पादन वाढीची कार्यपद्धती ही पुस्तिका 100 शेतकरी बांधवांना मा. धनाजी मुळे व्हा. चेअरमन यांच्या मार्फत भेट देण्याचे घोषित करण्यात आले. याच कार्यक्रमात दावणगाव नगरीतील हज यात्रा करणारे पहिले मा. युसूबसाहेब वाडीवाले यांचा प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रकाश साखरे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशनराव बिरादार यांनी केले. सुत्र संचलन मा. रमेश जाधव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे मा. उमाजी मुळे, हुसेन साहेब वाडीवाले,रफीक बागवान, पांडूरंग फुले, बाबूराव भंडे, सतीश हुरुसनाळे, संग्राम पताळे, संतोष पताळे, पुंडलीक भोळे, चंद्रकांत कांबळे, शेतकरी संघटनेचे कालिदास भंडे, इत्यादीनी प्रयत्न केले. .
• श्रीनिवास मदनलाल सोनी
