दारू मटना साठी 2500 ची मागीतली लाच, अडकला लाचलुचपत जाळ्यात! उदगीर = राजेंद्र नेपाळबुवा गिरी, वय 58 वर्षे, पद - प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड, जि. लातूर (वर्ग -1) यांनी दारू व मटणाच्या पार्टी साठी 2,500/- रु. ची लाच मागितली अन अटकला जाळ्यात 58 वर्षीय तक्रारदार यांना त्यांचा चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून व त्यांची पेन्शन ची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणी करिता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्या करिता लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य लोकसेवक राजेंद्र गिरी यांनी दारू व मटणाच्या पार्टीसाठी 2,500/- रु. ची पंचासमक्ष लाच मागणी केली. थोड्या वेळाने लाच मागणी केलेली रक्कम घेवून तक्रारदार हे लोकसेवक यांना त्यांचे लातूर येथील कार्यालयात जावून भेटले असता प्राचार्य लोकसेवक राजेंद्र गिरी यांनी दारू व मटणाच्या पार्टी साठी मागितलेली लाचेची रक्कम 2,500/- रु. स्वतः पंचासमक्ष स्विकारली. आलोसे यांना लागलीच लाचेच्या रक्कमेसह जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधिक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, लातूर वटीम एसीबी लातूर यानी सापळा लावला भास्कर पुल्ली व अन्वर मुजावर पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर व टीम एसीबी लातूर यानी मदत केली पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर. हे तपास करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी