*उदगीर येथील पर्यावरण मित्र ओमकार जयश्री गांजुरे यांना पर्यावरण रत्न पुरस्कार..* :-उदगीर येथील समाजसेवक ओमकार जयश्री गांजुरे यांना त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील भरीव कार्यासाठी कै.त्र्यंबकप्पा माळेवाडे फाऊंडेशन तर्फे या वर्षीचा *पर्यावरण रत्न* या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरुबसप्पा माळेवाडे यांनी दिली *कारवाँ फाऊंडेशन* उदगीर च्या माध्यमातुन उदगीर सारख्या दुष्काळी भागात तरुणाची एक फौज निर्माण करत सीड बॉल निर्मिती करत तालुक्यातील सर्व शाळेत सीड बॉल कार्यशाळा त्यांनी घेतल्या.लाखो सीड बॉल, वृक्षारोपण,रेन वॉटर हार्वेस्टिंग,वाचन कट्टा व पर्यावरण वाचवण्यासाठी सायकलींग चळवळ उभी करत आज पर्यंत तिरुपती,रामेश्वरम्,वाराणसी, स्टॅच्यू ऑफ युनिटी,अष्टविनायक अश्या विविध ठिकाणी उदगीर पासून सायकल प्रवास करत "पेडल टू गो" सायकलिंग समूहाच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती करण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. उदगीर येथील तरुणांना रक्तदान चळवळीत व्यापक प्रमाणात सहभागी करून हसत हसत रक्तदान करण्याची सवय लावण्याचे कार्य त्यांनी आजपर्यंत केले वाढदिवस साजरे करताना रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त करत तरुणाईला एक अनोख्या पद्धतीने रक्तदान करण्याचा पायंडा या उदगीर शहर व तालुक्यात त्यांनी घालून दिला. सोबतच "प्रयास" या सामाजिक सौख्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेतही त्यांचे योगदान आहे.या सर्व त्यांच्या निस्वार्थ कार्याचा गौरव म्हणून येत्या 30 मार्च 2023 ला ओम गांजुरे यांचा ओम गार्डन,फंक्शन हॉल,रिंग रोड उदगीर येथे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,माजी मंत्री बछू कडू,माजी राज्यमंत्री संजय बनसोडे,खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत *पर्यावरण रत्न* या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राहुल रमेश आंबेसंगे,विजय निटूरे,अहमद सरवर,आशिष पाटील राजूरकर,ॲड अदिती पाटील,सूरज पोस्ते,सतीश पाटील मानकीकर,मदन पाटील,अमोल घुमाडे,शिवकुमार जाधव,बिपिन पाटील,जय पूदाले,विनोद मिंचे,चवळे सूर्यकांत,महेश तोडकर,गुरुप्रसाद पांढरे,शिवकुमार उप्परबावडे,फय्याज शेख,मोतीलाल डोईजोडे,राजू मानवतकर,राजू चौधरी,चंद्रकांत ममदापुरे,अजित शिंदे आदींनी अभिनंदन केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
