मारवाड़ी युवा मंच च्या प्रांतीय झोन 4 उपाध्यक्ष पदी उदगीर मंच चे ॲड गोविंदा सोनी विजयी = प्रांत अध्यक्ष पदी अंबड मंच चे कैलाश राठी यांची बिनविरोध निवड = ॲड गोविंदा सोनी यांनी हिंगोलीच्या पवन उपाध्याय यांचा केला दारुण पराभव उदगीर= अखिल भारतीय मारवाडी युवा मंच च्या प्रांतीय झोन 4(मराठवाडा) ग साठी जालना येथे झालेल्या निवडणुकीत उदगीर मंच चे ॲड गोविंदा सोनी यांनी त्याचे प्रतिस्पर्धी हिंगोलीचे पवन उपाध्याय यांचा 11 मतांनी पराभव करत विजय मिळवला जालना येथे आज रविवारी मारवाडी युवा मंच प्रांतीय झोन 4 उपाध्यक्ष पदासाठी उदगीर मंच चे ॲड गोविंदा सोनी अणि हिंगोली मंच चे पवन उपाध्याय हे निवडणुक रिंगणात होते त्या साठी आज रविवारी जालना येथील सात्विक भोज मंगल कार्यालयात निवडणुक घेण्यात आली या वेळेस 36 पैकी 29 मतदारांनी मतदान केले त्यात ॲड गोविंदा सोनी याना 20 तर पवन उपाध्याय याना 9 मते पडली, निवडणुक अधिकारी म्हणून इचलकरंजी चे रामकिशोर वर्मा, अकोला चे संजकुमार अगरवाल हिंगोलीच्या अर्चना सोनी यांनी काम पाहिले, मतमोजणी नंतर निवडणुक अधिकारी रामकीशोर वर्मा यांनी ॲड गोविंदा सोनी याना विजयी घोषित केले,या नंतर मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिल खाबिया, प्रांत अध्यक्ष उमेश पंचारिया , जालना मंच अध्यक्ष महावीर जांगिड भावी प्रांत अध्यक्ष कैलाश राठी सह जालना मंच , अंबड मंच, कन्नड मिड टाऊन, अंबड मिड टाऊन यानी नूतन उपाध्यक्ष गोविंदा सोनी यांचा सत्कार करून पुढील वाचालीसाठी शुभेच्या दिल्या, प्रांत अध्यक्ष पदी अंबड मंच चे कैलाश राठी यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला
• श्रीनिवास मदनलाल सोनी

