रस्त्याचा सहा महिन्यातच वाजला बोरया,विद्रोही पत्रकार संघा ने केली चौकसी व बिल रोकण्याची मागणी! उदगीर= गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर जिल्हा लातूर याना निवेदन देऊंन विद्रोही पत्रकार संघाने मागनी केली की सोमनाथपुर ता उदगीर ग्रामपंचायत हद्दीतील एम् आर इ जी एस मार्फत नांदेड रोड ते महेश कॉलनी अंतर्गत झालेल्या निकृष्ट रस्त्याची क्वालिटी कंट्रोल मार्फत संपूर्ण चौकशी करूनच संबंधित बिल अदा करणे अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामांस आपण जबाबदार राहणार, बिल देऊ नये, एम आर ई जी एस अंतर्गत उदगीर पंचायत समिती ने तालुक्यांतील सोमनाथपुर ग्रामपंचायत ने नांदेड रोड ते महेश कॉलनी पर्यंतचा 400मीटर च्या रस्त्यासाठी 19लाख 99हजार 268रु चा कार्यारंभ 25/03/2022 रोजी देण्यात आला होता, संबंधीत रस्त्यांचे काम फारच निकृष्ट करण्यात आले असून सहा महिन्यात रस्तर जागोजागी उखडत असून, खडी व रेती बाहेर येतं आहे, संबंधित ग्रामंचायत अंतर्गत संबंधित ठेकेदाराने हे काम फारच निकृष्ट दर्जाचे केलें असून संबंधित रोड चे क्वालिटी कंट्रोल मार्फत संपूर्ण चौकशी झाल्या शिवाय सदरील कामाचे बील ग्रामपंचायत कडे वर्ग करण्यात येऊ नये, अन्यथा बील अदा केल्यास आपण व आपला विभाग जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, बिल अदा केल्यास आम्हास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल याची ही नोंद घ्यावी असे निवेदन दिले असुन संबंधित निवेदनाची *सादरप्रत* 1) मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई 2) ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य 3) विभागीय आयुक्त औरंगाबाद 4) जिल्हाधिकारी लातूर 5) मुख्याधिकारी जि प लातूर 6) उपजिल्हाधिकारी उदगीर याना ही देन्यात आली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
