रिटेल केमिस्ट अँड ड्रेगिष्ट तर्फे उदगीर च्या डॉक्टर असोसिएशन ला निवेदन,आप लिखे खुदा पडे बंद करा . उदगीर=. डॉक्टरने लिहून दिलेले विहित नमुन्यातील औषधे अचूक व स्पष्ट लिहिण्यात यावे म्हणून रिटेल केमिष्ट संघटने तर्फे डॉक्टर असोसिएशन ला निवेदन देऊन आप लीखे खुदा पडे बंद करण्याची विनंती केली आहे जिल्हातील अनेक केमिस्ट बांधवाना डॉक्टरने लिहून दिलेली औषधी त्यांचा आप लिखे मुळे समजत नाहीत . काहीं ठराविक डॉक्टर टंक लिखित लिहतात ते सर्वांना समजतात पण काही डॉक्टर लिहलेली औषधी रुग्ण व केमिस्ट ना पण वाचता येत नाही. त्यांची लिपी ही फक्त त्यांच्याच केमिस्ट ला समजते तरी सर्व डॉक्टराना स्पष्ट समजेल अश्या अक्षरात लिहण्यास प्रोत्साहित करावे असे निवेदनात सांगण्यात आले आहे . डॉक्टरांच्या अश्या लीहिण्याने एकाधे औषधी चुकून दुसरी दिली गेली तर त्या रुग्णाचे झालेले नुकसान जबाबदार डॉक्टर व मेडिकल दोघेही असतील असे या निवेदनात कळविले आहे , हे निवेदन वैद्यकीय अधीक्षक कार्यालय व इंडियन मेडिकल असोसिएशन उदगीर यांना हि देण्यात आली आहे.आहे. या निवेदना वर प्रकाश मेडिकल ,श्रीराम मेडिकल ज्योती मेडिकल ,पूनम मेडिकल ,खलील मेडिकल ,राज मेडिकल ,राहुल मेडिकल सह जिल्हातील 55 केमिस्ट च्या सह्या आहेत .
• श्रीनिवास मदनलाल सोनी
