उदगीरात भेसळ युक्त दुधाची विक्री, अन्न व औषध प्रशासन मुग गिळून गप्प? उदगीर = उदगीर शहर परिसरात अनेक जण भेसळ युक्त दूध खुलेआम विक्री करून जनतेच्या आरोग्याशी खेळत असताना ही अन्न व औषध प्रशासन अधिकारी मूग गिळून गप्प असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे उदगीर शहर परिसरात अनेक जन शुद्ध गावरान दूध म्हणून सकाळ संध्याकाळ चौका चौकात विकत आहेत, हे दूध किती शुद्ध आहे हे त्यांनाच माहीत, मागील महिन्यात एका ने उदगीरातील एक दूध विक्रेत्यांचे दूध घेऊन त्याची दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यायात तपासणी केली त्यात तपासणीत दुधात भेसळ आढळून आली, या नंतर त्यांनी जिल्हाधिकारी मार्फत अन्न व औषध प्रशासना कडे17/03/2023रोजी तक्रार केली, अन्न व औषध प्रशासनाने सदरिल दुधाचे नमुने तपासणीसाठी घेऊन गेले त्यास 26 दिवस होऊन ही त्या दुधाचा तपासणी अवहाल आणखी आला नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सांगत आहेत, भेसळी चा अवाहाल जर महिना महिना येत नसेल जर खरेच दूध भेसळ असेल तर एक महिना दूध पिणार्याच्या आरोग्यावर चांगला परिणाम किती होतील हे त्यांनाच माहीत , अन्न व औषध प्रशासनाने त्वरीत उदगीर शहर व परिसरातील दूध विक्रेत्यांचे नमुने घेऊन त्वरीत तपासणी करावी व ज्या दुधात भेसळ असेल त्या दूध विक्रेत्यांवर त्वरीत कडक कार्यवाही करावी अशी मागणी मानव अधिकार संघटन चे अड संगमेश्वर मसगले यानी वरिष्टा कडे करणार असल्याचे ते सांगत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी