22 तासा नंतर ही अर्धे उदगीर अंधारात = अनेक ठिकाणी झाडे पोल वर, केबल तुटलेले रस्त्यावरच उदगीर= उदगीर शहर व परिसरात काल दुपारी झालेल्या वादळी पावसात सगळ्यात जास्त नुकसान महावितरण झाले असून लाईट चे पोल व केबलावर झाडे पडल्याने मागील 22 तासापासून अर्धे उदगीर अंधारात गेले आहे,22 तास उलटून ही अनेक अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या पोल वर लटकत असून केबल ही तुटून अस्त व्यस्त पडले आहेत,या बाबत महावितरण चे कार्यकारी अभियंते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की काल पासून आमचे 60 कर्माचारी काम करत असून, वारंवार होणाऱ्या पावसामुळे कामात व्यत्यय येत असून पहले मुख्य लाइन चालु करून नंतर अंतरिम लाईट चालु करण्यात येईल.मागील 22 तासांपासून लाईट नसल्यानें पाणी, मोबाईल चार्जिंग नसल्यानें उदगीर कर पारेशान आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

