उदगीर तालुका माहेश्वरी सभेचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन उदगीर : उदगीर येथील व्यापारी उमेश गोकुळदास झंवर यांच्या मुलास मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी वसूल केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून झंवर कुटुंबास संरक्षण मिळणे व गुन्हातील सर्व आरोपीस अटक करुन कडक शासन करावे या मागणीसाठी उदगीर तालुका माहेश्वरी सभेच्या वतीने तथा सर्व मारवाडी समाजबांधवांच्या वतीने आज, दि. 3 एप्रिल रोजी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देउन मागनी करण्यात आली उदगीर येथील व्यापारी उमेश झंवर यांच्या अल्पवयीन मुलास बंदुकीचा धाक दाखवून अमानूष मारहाण करून त्याच्या कडून 2 लाखाच्या वर शैलेश पाटील, वैभव देशमुख, आदित्य कांबळे, ओमकार खंडागळे या आरोपीने खंडणी वसूल केली या बाबत उमेश झंवर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन उदगीर मध्ये दि 30/03/2023 रोजी संबंधिता विरुद्ध गुन्हा रजि 198/2023 ने कलम 384,386323, 504,506, 34 भादवी ने गुन्हा दाखल केला असून पोलिस प्रशासनाने एक आरोपी ओमकार यास अटक केले असून बाकी तिन्ही आरोपी फरार आहेत. संबंधित आरोपीकडून झंवर परिवारास धोका असून त्यांना संरक्षन द्यावे व बाकी आरोपीस त्वरीत अटक करून त्यांना कडक शासन करावे असी मागणी या निवेदनात करण्यात आली असून या निवेदनावर सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी सचिव राजगोपाल मणियार, ईश्र्वरप्रसादबाहेती , विनोदकुमार टवानी, आनंद बजाज, राधेश्याम नावंदर, राजगोपाल राठी, सत्यनारायण सोमाणी, राजकुमार बलदवा, ओमप्रकाश गिल्डा, संपतकुमार लोया, राजकुमार सारडा, गणेश बजाज, उमेश झंवर, युवा मंच प्रांत मंडळ 4 चे उपाध्यक्ष विधीज्ञ. गोविंदा सोनी, मंच अध्यक्ष पवन मुंदडा, कोमल मालपाणी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
