लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रकाशजी कासट यांची सर्वानुमते निवड उदगीर : लातूर जिल्हा माहेश्वरी सभेची २०२३-२०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा कार्यकारिणी आज जाहीर झाली. यामध्ये लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी प्रकाशजी कासट यांची सर्वानूमते निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी आपला जवळपास ६ वर्ष यशस्वीपणे कार्यकाळ पूर्ण करून प्रकाशजी कासट यांच्याकडे पदभार सोपविला. दरम्यान, अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व समाजबांधवांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचें स्वागत केले. लातूर येथील लाहोटी कंपाउंड स्थित लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या कृष्णकुमार लाहोटी सभागृहात मंगळवार, दि. ४ एप्रिल रोजी आयोजित पद्ग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी माहेश्वरी सभेचे प्रांत अध्यक्ष श्रीकिशनजी भन्साळी, महाराष्ट्र प्रदेश मंत्री मदनलालजी मणियार, मराठवाडा विभागप्रमुख संजयजी मंत्री, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, दयानंद शिकण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, हुकूमचंद कलंत्री आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नूतन कार्यकारीणीत उपाध्यक्षपदी ओमप्रकाश सारडा, जयप्रकाश खटोड, मधुसूदन सोनी यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी जगदिश भुतडा, संघटनमंत्री पदी विजयकुमार चांडक तर संयुक्त मंत्रीपदी राजगोपाल बाहेती, गोकुळदास चांडक यांची निवड करण्यात आली. तहसील उपाध्यक्षपदी डॉ. राजेंद्र बाहेती (मुरूड), दीपक भुतडा (अहमदपूर) यांची निवड करण्यात आली. याशिवाय महेश आवास प्रकल्प प्रमुख गोविंदजी कोठारी, सहकोषाध्यक्ष प्रल्हाद चांडक, माहेश्वरी चौक निर्माण प्रमुख गणेश हेड्डा, कार्यालयीन मंत्री चांदकरण लड्डा,अखिल भारतीय सदस्य राजकुमार पल्लोड, हुकूमचंद कलंत्री, फुलचंदजी काबरा, बालकिशन मुंदडा, गोविंद कोठारी. महाराष्ट्र प्रदेश सदस्य ईश्वर बाहेती, दिलीप सोमाणी, रामेश्वर गिलडा, श्यामसुंदर सोनी, नंदकिशोर लोया, बजरंग पल्लोड, गगन मालपाणी, रामेश्वर भराडीया, गोकुळ चांडक, भारत धुत, सहसंघटन मंत्री रामनिवास धुत, महेश बिदादा, पुरुषोत्तमजी कालिया, आयटी सेलप्रमुख अशोकजी जाजू, मीडिया व प्रचार मंत्री श्याम भट्टड, सांस्कृतिक व क्रीडा मंत्री विनय भुतडा, आदित्य बिर्ला, जयराम भुतडा, वेल्फेअर प्रमुख सत्यनारायण हेड्डा, जेष्ठ नागरिक प्रमुख सत्यनारायण लड्डा, महिला अध्यक्ष मंगल लड्डा, लातूर शहर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष नंदकिशोर लोया, विष्णुप्रसाद सारडा, युवा अध्यक्ष दीपक बजाज तर सल्लागार मंडळामध्ये लक्ष्मीरमणजी लाहोटी, रमेशजी बियाणी, ईश्वर डागा, सुरेश मालू, सुभाषजी सोमाणी, मल्लिनाथ लड्डा, लक्ष्मीकांत सोमाणी, रमेशजी राठी, श्यामसुंदर खटोड यांची निवड करण्यात आली.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
