उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक धनशक्ती विरूद्ध सज्जन शक्ती मा. आमदार सुधाकर भालेराव उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत धनशक्ती विरूद्ध सज्जनशक्ती ची असून शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही ही निवडणुक लढवत असून आमच्या पैनल ला मिळत असलेला प्रतिसाद पाहता या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत केली उदगीर ची बाजार समिती ही मराठवाड्यातील दोन नंबर ची बाजार पेठ असून या बाजार पेठेत करोडोचा व्यवहार होत असून अनेकांनी या बाजापेठेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत असून काही जण आपले घर भरून घेण्यासाठी या निवडणुकीत उभे आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे ही भालेराव म्हणाले,या वेळेस सभापती पदाचे उमेदवार भगवान पाटील तलेगावकर यानी महविकास आघाडी चे उमेदवार हे फक्त आपले मार्केट फी वाचवण्यासाठी अणि आपले घर भरून घेण्यासाठी उभे असून त्यांचा मतदार दारुण पराभव करून उदगीर बाब शेतकरी विकस पैनल च्या सर्व उमेदवारास भरघोस मताने विजयी करणार असे हे ते म्हणाले या पत्रकार परिषदेला माजी आमदार गोविंद केंद्रे,पूर्व नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले तालुकाध्यक्ष मनोज पुदाले खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, जी प पूर्व अध्यक्ष राहूल केंद्रे , शहाजी पाटील,बापू राठोड, पंडित सुर्यवंशी, नंदू नलंदवार, वसंत सिर्से, मनोहर भंडे, मनोज चिखले, उदय ठाकूर सह पैनल चे सर्व उमेदवार उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
