महेश कॉलनी येथील घराना ब्लास्टिंग ने गेले तडे, तक्रार करुण ही महसुल विभाग मूग गिळून गप्प? = ब्लास्टिंग करणाऱ्यास वाचवण्यासाठी महसूल अधिकारी गप्प?; रहिवाश्यांच्या नुकसानीस कोण जबाबदार। उदगीर: उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन च्या मागें सोमनाथपुर ग्रामपंचायत हद्दीतील महेश कॉलनी बाजूस डोंगर फोडण्या साठी केलेल्या ब्लास्टिंग मुळे या कॉलनीतील अनेक घराना तडे गेल्याने तेथील नागरिकांनी उदगीर येथील तहसीलदार श्री रामेश्वर गोरे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती पण ही तक्रार देउन आठ दहा दिवस होऊन ही महसूल चां अधिकारी किँवा तलाठी येथील रहिवास्याच्या समस्या जाणून घेण्यास किंवा रहिवास्याना दिलासा देण्यासाठी न आल्याने महसूल विभाग किती तत्पर आहे है दिसत असून , महसूल विभाग अधिकारी किँवा गौण खनिज विभाग कर्मी ब्लास्टिंग करणाऱ्यास वाचवित तर नाहीत ना हा मुद्दा उपस्थित होत असून जर गौण खनिज विभाग ब्लास्टिंग करणाऱ्यास वाचिवत असेल तर येथील रहिवाशांचे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न उपस्थित होत असून येथील रहिवासी या प्रकरणात लवकरच औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे ही समजते
• श्रीनिवास मदनलाल सोनी

