आषाढी यात्रा वारकऱ्यांसाठी 28 जून ला उदगीर हून पंढरपूरला रेल्वे ची सोय उदगीर=केंद्रीय राज्यमंत्री नामदार भगवंत खुब्बा साहेब यांनी येणाऱ्या आषाढी एकादशी साठी वारकऱ्यांच्या सेवेत प्रतिवर्षाप्रमाणे यात्रा स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाला पत्र देऊन केली होती. या पत्राची त्वरित दखल घेत द.म.रे. प्रशासनाने बुधवार 28 तारखेला गाडी संख्या 07501 आदिलाबाद - पंढरपूर व्हाया उदगीर (रात्री8:50),भालकी(रात्री 9:35),बीदर(रात्री10.00) सोडली असून परतीला ती गुरूवारी 30 तारखेस रात्री पंढरपूरहून निघून शुक्रवार सकाळी 9: 35ला बीदर, भालकी 10:00 तर उदगीर 10:40 ला पोहचून पुढे लातूर रोड,परळी,परभणी,नांदेड मार्गे आदिलाबाद ला जाईल. या स्पेशल रेल्वेचा सीमावर्ती भागातील विठू भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे संघर्ष समिती उदगीर तर्फे मोतीलाल डोइजोडे यानी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी